भुसावळात भरधाव कारचा टायर फुटल्याने पाच वर्षीय बालिका ठार


Five-year-old girl killed after speeding car tires burst in Bhusawal भुसावळ (22 मे 2025) : भुसावळकडून निंभोर्‍याकडे घरी जात असतांना आर्टीका कारचे पुढचे टायर फुटल्याने कार महामार्गावर पलटी झाली. यात गाडीत बसलेच्या पाच वर्षीय आरुषीचा मृत्यू झाला तर महिलेसह पुरूष जखमी झाले. अपघातानंतर महामार्गावर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली.

कारचा टायर फुटल्याने अपघात
दीपनगराजवळील निंभोरा येथील रहिवासी विजय बशिरे हे त्यांच्या परिवारातील सदस्यांसह भुसावळकडून निंभोरा येथे घरी आर्टीका कारने (एम.एच.04 जी.एम.0680) फेकरी टोल जवळ अचानक कारचे पुढच्या डाव्या बाजूचे टायर फुटले यामुळे कार दुभाजकावर आदळली त्यात ती पलटी झाली. यावेळी चालकाच्या बाजूच्या शीटवर बसलेली आरूशी ही गाडीतून बाहेर फेकली गेली. तिच्या डोक्याला मार लागला. तिला खाजगी हॉस्पीटलमध्ये तत्काळ दाखल केले मात्र तिचा मृत्यू झाला. या अपघातात मागील सीटवर बसलेली एक महिला व पुरूष हे जखमी झाले

त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शाम मेारे, सहायक फौजदार युनूस शेख, संदीप बडगे यांनी पंचनामा केला. बालिकेच्या मृतदेहाचे ट्रामा सेंटरमध्ये शवविच्छेदन करण्यात आले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !