कार-दुचाकी अपघातात तळेगावातील तरुण ठार

Talegaon youth killed in car-bike accident चाळीसगाव (19 जून 2025) : भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने तळेगाव, ता.चाळीसगाव येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. हा अपघात 13 जून रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली. या संदर्भात बुधवार, 18 जून रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कारवरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. विनायक बाळू मेटकर (37, रा.तळेगाव ता. चाळीसगाव) असे मृताचे नाव आहे.
काय घडले नेमके
विनायक मेटकर आणि त्याचा मित्र शुभम बाळकृष्ण देशमुख हे दोघे दुचाकी (एम.एच.19 डी.व्ही.1874) या दुचाकीने चाळीसगावकडून तळेगावकडे जात असताना मागून येणार्या कार (एम.एच.48 पी.4439) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात विनायक मेटकर हा तरुण जागीच ठार झाला, तर त्याच्यासोबत असलेला शुभम देशमुख गंभीर जखमी झाला. अपघात घडल्यानंतर कारचालक आपली कार घेऊन घटनास्थळावरून पसार झाला होता.
अज्ञात चालकावर गुन्हा दाखल
या घटनेबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. त्यानुसार, कारवरील अज्ञात चालकाविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक नरवाडे करीत आहेत.
