जळगावात हिट अॅण्ड रनचा थरार : कार चालकाच्या धडकेत अनेक जखमी

Hit and run incident in Jalgaon : Many injured in car crash जळगाव (20 जून 2025) : जळगाव भरधाव कार चालकाने पादचार्यांना धडक देत इतर वाहनांना धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात वंदना सुनील गुजराथी ( 49, रा. पार्वतीनगर) या महिलेला धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही घटना गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास महाबळ परिसरात घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी वाहनचालक मोंटू सैनी (26, रा.वाघ नगर) यास ताब्यात घेतले आहे.
काय घडले जळगावात
वाघ नगरमधील मोंटू शिवपाल सैनी हा कार (क्र.एम.एच.19, ई.पी.1694) घेवून भरधाव वेगाने जात असताना महाबळ परिसरातील खासगी क्लासेसजवळ त्याने अनेक वाहनांना धडक दिली. यामध्ये वाहन चालक गंभीर जखमी झाले. त्यानंतर पुढे गेल्यानंतर रस्त्याने जात असलेल्या वंदना गुजराथी यांना धडक दिली. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अनेकांना धडक देणार्या वाहनचालकाचा परिसरातील नागरिकांनी पाठलाग केला. सैनी हा दर्गा परिसरात वाहन सोडून झाला मात्र त्याला कोल्हे हिल्स परिसरात पकडत पब्लिक मार देत पोलिसांच्या स्वाधीन केले. रामानंद नगर पोलिसांनी सैनीला ताब्यात घेत त्याचे वाहनदेखील जप्त केले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
