वडीलांनी रागावताच जळगावातील अल्पवयीन तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

A minor girl from Jalgaon took extreme steps after her father got angry जळगाव (20 जून 2025) : जळगावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. प्रज्ञा रवींद्र शिंदे (16, रा.खेडी हुडको परिसर) असे मृताचे नाव आहे. वडील रागावल्याने अल्पवयीनाने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले.
काय घडले नेमके
खेडी हुडको परिसरात राहणारे रवींद्र शिंदे हे सेंट्रिंगचे काम करतात. ते आपली पत्नी, तीन मुली आणि दोन मुलांसह राहतात. त्यांची 16 वर्षांची मुलगी प्रज्ञा बुधवारी बाहेर गेली होती आणि रात्री आठ वाजता घरी परतली. यावरून तिच्या वडिलांनी तिला जाब विचारला आणि रागावले. वडिलांच्या बोलण्याने चिडलेल्या प्रज्ञाने कोणालाही काहीही न सांगता घरातून पुन्हा निघून गेली. घरापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर असलेल्या बैठक हॉलजवळील एका विहिरीत तिने उडी घेतली. गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली.
घटनेची माहिती मिळताच प्रज्ञाचे नातेवाईक आणि शनिपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. काही नागरिकांच्या मदतीने मुलीला विहिरीतून बाहेर काढण्यात आले आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला परंतु तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आपल्या मुलीचा मृतदेह पाहताच आई-वडिलांनी मोठा आक्रोश केला. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
