18 वर्षीय विवाहितेवर भर दिवसा चौघांचा सामूहिक अत्याचार


18-year-old married woman gang-raped by four in broad daylight अहिल्यानगर (22 जून 2025) : अहिल्यानगरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 18 वर्षीय विवाहिता घरात पाणी भरत असताना दुचाकीवरून आलेल्या चौघांनी विवाहितेला बेडरूममध्ये नेत तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याने खळबळ उडाली आहे.याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात चार इसमांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

भर दिवसा घडली घटना
पीडितेच्या फिर्यादीनुसार ती घरी एकटीच होती. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पाणी भरण्यासाठी ती मोटार लावत असताना दोन दुचाकीवरून चार अनोळखी इसम तेथे आले. त्यांनी तोंडाला काळे मास्क लावले होते. दुचाकीवरून उतरून ते थेट घरात घुसले. त्यांनी पीडितेचे तोंड दाबले व तिला उचलून बेडरूममध्ये नेले. तेथे पीडितेवर अत्याचार केला. त्यानंतर चौघे दुचाकीवरून निघून गेले. या घटनेनंतर पीडिता व तिचे नातेवाईक कोतवाली पोलिस ठाण्यात आले. घडलेला प्रकार पीडितेने पोलिसांना सांगितला. पोलिसांनी पीडितेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले.

डोक्यात टोपी, मेहंदी रंगाचे मास्क
घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. पीडितेच्या घराकडे जाणार्‍या रस्त्यावरील सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले. मात्र त्यातून माहिती मिळू शकलेली नाही. तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक तेजश्री थोरात करत आहेत. आरोपींनी लाल रंगाची टोपी व मेहंदी रंगाचे मास्क घातलेले होते, अशी माहिती पीडितेने पोलिसांना दिली आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !