खिरोद्यातील हॉर्टीकल्चर महाविद्यालयाच्या जागेला कुलगुरूंनी दिला ‘ग्रीन सिग्नल’
रावेर- खिरोदा येथील हॉर्टीकल्चर कॉलेजच्या जागेची पाहणी आणि सीमांकन करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.के.पी.विश्वनाथा हे शनिवारी खिरोदा येथे आले होते. पाहणी केल्यानंतर त्यांनी या जागेला परवानगी दिली. नामदार हरीभाऊ जावळे यांच्या सुचनेनुसारच या कामाला गती प्राप्त झाली. कुलगुरू यांनी संबधीत विषयांसंदर्भात महसूल विभागाकडे या जागेची मागणी सादर करण्याची सूचना या वेळी दिल्या आहेत. नामदार जावळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अत्यंत कमी कालावधीतच ही मोठी उपलब्धी मानली जात आहे. हॉर्टीकल्चर कॉलेजमुळे या भागात मोठा रोजगार उभा राहणार आहे. या कॉलेजच्या माध्यमातून केळीवर येणार्या रोगांच्या संदर्भात मार्गदर्शन शेतकर्यांना होणार आहे.केळीला पर्यायी पिकासंदर्भात सुद्धा या कॉलेजच्या माध्यमातून मार्गदर्शन शेतकर्यांना होणार आहे.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणेन, रीसर्च डायरेक्टर डॉ.शरद गडाख, शिक्षण डायरेक्टर डॉ.अशोक परांदे, रजिस्टार सोपान कासार, विद्यापीठ अभियंता मिलिंद डोके, कार्यकारी परीषद सदस्य डॉ.महाले, उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ.शरद रणपिसे, डॉ.भालेकर, उपकुलसचिव विद्या पी.टी.सूर्यवंशी, डॉ.पंकज सैदाणे, तेलबिया संशोधन केंद्र जळगावचे डॉ.सुदाम पाटील, व्ही.सी.मेंबर नरेंद्र पाटील, डॉॅ.गणेश देशमुख यांच्यासोबत खिरोदा सरपंच संताबाई भारंबे, उपसरपंच राहुल चौधरी, चिनावल सरपंच भावना बोरोले, कळमोदा सरपंच सरला पाटील, हर्षल पाटील, विलास चौधरी, डॉ.आर.एम.चौधरी, अहमद तडवी, प्रशांत तायडे उपस्थित होते.