माजी आमदार शिरीष चौधरींच्या जनसंवाद यात्रेला प्रतिसाद


रावेर- माजी आमदार शिरीष चौधरी यांनी रावेर-यावल विधानसभा मतदारसंघात काढलेल्या जनसंवाद यात्रेला महिला व पुरूष मतदारांमधून उस्त्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. सर्व समाजाचा पाठिंबादेखील मिळत आहे. 2009 ते 2014 च्या दरम्यान चौधरी हे आमदार असतांना केलेल्या कामांची आठवण ग्रामस्थ करून देत आहेत. 2014 मध्ये चौधरी यांना पराभव पत्कारावा लागला होता होता मात्र आता विधानसभा निवडणुकीसाठी चौधरी पुन्हा उमेदीने कामाला लागले आहेत. गेल्या 12 दिवसांपासून माजी आमदार शिरीष चौधरी यांनी रावेर-यावल मतदारसंघात जनसंवाद यात्रा काढली असून ते जनतेशी संवाद साधत आहेत. मतदारसंघातील बहुसंख्य असलेला मराठा, लेवा पाटील, मुस्लिम, बुद्धीस्ट व इतर समाजातील प्रतिष्ठित माजी आमदारांसोबत दिसून येत आहेत. माजी शिरीष चौधरी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत.


कॉपी करू नका.