जळगाव अपर पोलिस अधीक्षकपदी संदीप गावीत


गणेश वाघ
Sandeep Gavit Appointed as Additional Superintendent of Police, Jalgaon  भुसावळ (10 एप्रिल 2026) : जळगावच्या अपर पोलिस अधीक्षकपदी संदीप गावीत यांची नियुक्ती करण्यात आली असून या संदर्भातील आदेश शासनाचे सहसचिव सुग्रीव धपाटे यांनी काढले आहेत.

अपर अधीक्षक अशोक नखाते यांची बदली
जळगावचे अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या जागेवर राज्य पोलिस सेवेतील अपर पोलिस अधीक्षकपदी संदीप गावीत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाचे सहसचिव सुग्रीव धपाटे यांनी तीन अधिकार्‍यांच्या शुक्रवारी बदल्या केल्या आहेत. नखाते यांच्या बदलीची स्वतंत्र ऑर्डर निघणार असल्याने त्यांची नियुक्ती अद्याप कुठे करण्यात आले हे कळू शकले नाही.


अभ्यासू अधिकारी : जिल्ह्यात कामकाजाचा अनुभव
संदीप गावीत यांनी यापूर्वी जळगाव विभागाचे पोलिस उपअधीक्षक म्हणून काम केले आहे शिवाय त्यांना जिल्ह्याची माहिती आहे शिवाय भुसावळ विभागाची धूराही 31 जुलै 2025 रोजी सांभाळली होती. दोन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी प्रभावी काम केल्याने जिल्हावासीयांना गावीत यांच्या कार्याची पद्धत ठावूक आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा जिल्ह्याला निश्चितपणे होणार आहे.

या अधिकार्‍यांनाही मिळाली नियुक्ती
कोकण- 2 विभागातील दीपाली मोहन खन्ना यांना मुंबई राज्य गुप्त वार्ता विभागाच्या उपायुक्तपदी तर अमरावती विभागाच्या प्रांजली नवनाथ सोनवणे यांची अमरावती गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात करण्यात आली आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !