अवघ्या 70 हजारांसाठी तरुणाची गळा चिरून हत्या : पोलिसांकडून अखेर गुन्ह्याची उकल


पुणे (24 एप्रिल 2026) : उसनवार घेतलेल्या 70 हजारांच्या वादातून तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक बाब पुण्यात घडली आहे. सुरूवातीला तरुणाच्या हत्येचे कारण निष्पन्न झाले नसलेतरी पोलिसांनी खोलवर केलेल्या तपासात ही बाब उघड झाली. कृषल कसबे (वय 33, रा. महात्मा फुले पेठ) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात ओंकार कांबळे (27, रा.धनकवडी, पर्वती) विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपींनी अंगावरील कपडेही बदलल्याचे निष्पन्न
डेक्कन येथे गाडगीळ पूल (झेड ब्रिज) आणि छत्रपती संभाजी पुलादरम्यान नदीपात्रातील मोकळ्या जागेत 19 एप्रिलला सकाळी साडेसातच्या सुमारास कसबे यांचा मृतदेह आढळून आला होता. शस्त्राने गळा चिरल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. डेक्कन पोलिसात गुन्हा दाखल केला होता. गुन्हे शाखा आणि डेक्कन पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. त्यात कांबळे याची दुचाकी हडपसरमध्ये आढळून आली आहे. दुचाकीवर रक्ताचे डाग आढळले आहेत. तसेच डिकीत तीन मोबाइलही सापडले आहेत. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी अंगावरील कपडेही बदलल्याचे निष्पन्न झाले आहे.

चौकशीत आर्थिक व्यवहारातून वाद झाल्याचे समोर
चौकशीत आर्थिक व्यवहारातून वाद निर्माण झाल्याचे समोर आले आहे. कांबळे याने कसबे याच्याकडून घेतलेले 70 हजार रुपयांची परतफेड केली नव्हती. यावरून दोघांमध्ये वाद झाला. घटनेच्या दिवशीही त्यांची भेट झाली. त्या वेळी वादातून शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आला. त्यानंतर आरोपी पसार झाले होते.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !