भूजल अहवालासाठी दोन लाखांची लाच भोवली : दोघे अधिकारी एसीबीच्या जाळ्यात


₹2 Lakh Bribe for Groundwater Report Proves Costly : Two Officials Caught in ACB Trap पुणे (25 एप्रिल 2026) : इमारतीचा पूर्णत्वाचा दाखला मिळवण्यासाठी आवश्यक असलेला भूजल सर्वेक्षण अहवाल देण्यासाठी दोन लाखांची लाच मागून ती स्वीकारताना पुण्यातील शिवाजीनगर येथील वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विभागातील दोन बड्या अधिकान्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. दिवाकर नामदेव धोटे (53, वरिष्ठ भूवैज्ञानिक, वर्ग-1) आणि प्रियंका संदिपान घुले (9. कनिष्ठ भूवैज्ञानिक, वर्ग-2) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

असे आहे लाच प्रकरण
46 वर्षीय तक्रारदाराने आपल्या इमारतीच्या बांधकामाच्या पूर्णत्वाच्या दाखल्यासाठी पीएमआरडीएकडे अर्ज केला होता. नियमानुसार यासाठी भूजल सर्वेक्षण अहवाल सादर करणे अनिवार्य होते. हा अहवाल देण्यास्वठी कनिष्ठ भूवैज्ञानिक प्रियंका घुले यांनी स्वतःसाठी आणि वरिष्ठ भूवैज्ञानिक दिवाकर धोटे यांच्यासाठी सुरुवातीला दोन लाख 50 हजार रुपयांच्या लाच मागितली मात्र तक्रारदाराने या मागणीबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे तक्रार नोंदवली, एसीबीने या तक्रारीची पडताळणी करून सापळा रचला. लाचेच्या सापळ्यानंतर आरोपींविरोधात शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
ही सापळा पुणे एसीचीचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले, सहायक पोली आयुक्त दवानंद गावडे आणि अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर, खंडेराव रंजये व त्यांच्या पथकाने यशस्वी केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !