जळगाव अधीक्षक अॅक्शन मोडवर : अवैध वाळू पोलिसांच्या रडारवर ; पहिल्याच दिवशी चार वाहने जप्त
Jalgaon Superintendent in ‘Action Mode’: Illegal Sand Trade on Police Radar ; Four Vehicles Seized on Day One जळगाव (25 एप्रिल 2026) : पोलीस, महसूल व राजाश्रयाने जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतुकीला ऊत आल्याचा आरोप होत असतानाच जळगावचे नूतन पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी अवैध वाळू वाहतुकीविरोधात धडक कारवाईचे आदेश दिले आहेत. पहिल्याच दिवशी 25 लाख रुपये किंमतीची चार वाहने पोलिसांनी जप्त केली असून वाळू वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहे. संपूर्ण जिल्हाभरात अशा पद्धत्तीने कारवाई होण्याची सुज्ञ नागरिकांना अपेक्षा आहे.
एका दिवसात चार वाहनांवर कारवाई
शुक्रवार, 24 एप्रिल रोजी रात्री आठ ते शनिवार, 25 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजेदरम्यान जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच वेळी ही मोहीम राबवण्यात आली. अवैध वाळू वाहतूक करणारी चार वाहने जप्त करण्यात आली असून एकूण 25 लाख 50 हजार रुपये किेंमतीचे दोन ट्रॅक्टर व दोन डंपर तसेच 43 हजार रुपये किंमतीची वाळू जप्त करण्यात आली.

अवैध वाळू वाहतूक करताना आढळलेल्या वाहनांवर बी.एन.एस. 2023 चे कलम 303(2) आणि मोटर वाहन अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भडगाव व यावल येथे प्रत्येकी तर चाळीसगाव ग्रामीण हद्दीत दोन कारवाया करण्यात आल्या.
