विवाहितेचा शॉकने मृत्यू मात्र माहेरच्यांना घातपाताचा संशय : शिक्षक पतीविरोधात गुन्हा
Married Woman Dies of Shock ; Family Suspects Foul Play: Case Registered Against Teacher Husband माढा (26 एप्रिल 2026) : विवाहितेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला मात्र हा घातपात असल्याचा आरोप माहेरच्यांनी केल्यानंतर शिक्षक पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथे घडली.
काय आहे प्रकरण ?
माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथे भाग्यश्री रविंद्र क्षिरसागर असे मृत्यू झालेल्या विवाहीत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिच्या भावाने माढा पोलीस ठाण्यात शिक्षक पती रविंद्र क्षिरसागर विरोधात तक्रार दिली आहे. भाग्यश्री यांचे 2011 मध्ये रविंद्र क्षिरसागर यांच्यासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर पतीकडून दारूच्या नशेत मारहाण, शिवीगाळ, तसेच माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी करत मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. याशिवाय, चारित्र्यावर संशय घेऊनही वारंवार त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

घातपाताचा संशय
घरामध्ये निष्काळजीपणे उघड्या विद्युत तारा ठेवल्यामुळे भाग्यश्री यांना विजेचा धक्का बसला. त्यानंतर त्या खाली पडून डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झालाफ या घटनेत घातपाताचा संशयही व्यक्त करण्यात आला असून शिक्षक पती रविंद्र क्षिरसागर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
