भुसावळ नगराध्यक्षा गायत्री भंगाळे लवकरच अपात्र होणार ; मंत्री संजय सावकारे

जिल्हाधिकारी लवकरच जाहीर करणार निर्णय : भुसावळात नव्याने नगराध्यक्ष पदाची होणार निवडणूक


गणेश वाघ
Bhusawal Municipal Council President Gayatri Bhangale to be disqualified soon: Minister Sanjay Savkare भुसावळ (26 एप्रिल 2026) : भुसावळ नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्या जातीचा दाखला अवैध ठरवण्यात आल्यानंतर त्यांच्यावर अपात्रतेचे संकट कायम असतानाच जळगावात मंत्री संजय सावकारे यांनी नगराध्यक्षा भंगाळे या लवकरच अपात्र होतील, असे सुतोवाच केले आहेत. यापूर्वीच आपण नगराध्यक्षांकडील कागदपत्रे बनावट असल्याचेही मंत्री यांनी सांगत जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने आपसुकच नगराध्यक्षा अपात्र ठरतात व जिल्हाधिकारी लवकरच याबाबत निर्णय जाहीर करतील, असेही मंत्री संजय सावकारे म्हणाले.

काय म्हणाले मंत्री सावकारे!
जळगावात मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी उपस्थित असलेले वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांना माध्यमांनी भुसावळ नगराध्यक्षा भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यासंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर मंत्री म्हणाले की, जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाबाबत यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मुळातच भंगाळे यांच्याकडील कागदपत्रे बनावट असल्याचे आपण निवडणुकीवेळी जाहीर सभेत सांगितले होते त्यामुळे समितीने तपासणीअंती हा निर्णय दिला आहे. केवळ नगराध्यक्षाच नाही तर त्यांच्या कुटूंबातील अन्य नातेवाईकांची व्हॅलीडीटी नाकारण्यात आली असल्याचा दावा मंत्री सावकारे यांनी यावेळी केला. दोन वर्षांपूर्वीच त्यांचे काका आपल्याकडे व्हॅलीडीटी मिळावी म्हणून आले असल्याचे ते म्हणाले. प्रत्येक राज्यासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले असून त्या राज्यातच संबंधिताना हे प्रमाणपत्र दिले जाते.

लवकरच होणार निवडणूक : भाजपाचा उमेदवार कोण ?
मंत्री संजय सावकारे म्हणाले की, जात पडताळणी समितीने दिलेल्या निर्णयानंतर आता जिल्हाधिकारी लवकरच नगराध्यक्षांना अपात्र घोषित करतील व भुसावळ नव्याने नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. भुसावळात भाजपाकडून रजनीताई सावकारे यांना उमेदवारी देण्यात येणार का? या प्रश्नावर मंत्री म्हणाले की, अद्याप काहीही सांगता येत नाही. पक्ष नेतृत्वाचा निर्णय सर्वोच्च असतो त्यामुळे त्यावर आता काही बोलणे उचित होणार नाही.

नगराध्यक्षांच्या भूमिकेकडे लागले लक्ष
जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंंंतर नगराध्यक्षा आता काय भूमिका घेतात? याकडे लक्ष लागले आहे. सत्ताधार्‍यांना जातप्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर मोठा धक्का बसला असून आगामी काळात शहराच्या राजकारणात अनेक घडामोडी पहावयास मिळणार आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !