गजवा-ए-हिंद प्रकरण तपासात हलगर्जी भोवली ; नाशिकच्या महिला पोलिस निरीक्षकांची ‘उचलबांगडी’
पीडितेचीच मानहानी केल्याने खाकीवर डाग : निरीक्षक आमणे ’कंट्रोल’ मध्ये
Negligence in ‘Ghazwa-e-Hind’ Probe Proves Costl y; Nashik Female Police Inspector ‘Transferred Out’ नाशिक (27 एप्रिल 2026) : पंचवटीमधील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणार्या तरुणीच्या धार्मिक भावना दुखावणे आणि बलात्काराच्या गुन्हात तपासी अधिकारी म्हणून पीडितेचीच उलटतपासणी करणार्या पंचवटी पोलिस ठाण्याच्या महिला निरीक्षक ज्योती आमणे यांची पोलिस आयुक्तांनी तडकाफडकी नियंत्रण
कक्षात बदली केली असून या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण ?
पंचवटी परिसरात 29 वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यासोक्त शारीरिक संबंध ठेवत, गळयातील तुळशीमाळ तोडून तिला ‘गजवा ए-हिंद’ करण्यास भाग पाडत धर्मांतरासाठी दबाव आणल्याचा गंभीर गुन्हा पंचवटी पोलिसात दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास निरीक्षक ज्योती आमणे करीत होत्या.

पीडीतेची तक्रार अन निरीक्षक कंट्रोल जमा
पीडितेची चौकशी करताना तिची बाजू समजून न घेता तिलाच उलटसुलट आणि आक्षेपार्ह प्रश्न विचारून तरुणीला मानसिक त्रास दिल्याची लेखी तक्रार पीडितेने पोलिस आयुक्तांकडे केली व या तक्रारीची दखल घेत आयुक्तांनी सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख यांना गोपनीय चौकशी करण्याचे आदेश दिले. चौकशीत आमणे यांनी अतिसंवेदनशील प्रकरणाचा तपास करताना पीडितेलाच आरोपीच्या पिंजर्यात उभे केल्याचा ठपका ठेवण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखत आयुक्त संदीप कर्णिक यांनी आमणे यांची तत्काळ नियंत्रण कक्षात निरीक्षकांना हलवले.
संशयित कारागृहात
दोघे अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असताना तरुणीची 2024 मध्ये संशयित तांजीरसोबत ओळख झाली व संशयिताने भेटण्याचा बहाणा करत युवतीच्या ‘लव्ह बाइट’च्या नावाने जखमा केल्या. मोबाईलमध्ये फोटो काढले आणि ब्लॅकमेल करत भेटण्यास बोलावले. तरुणीला दारू पाजून तिच्यावर अत्याचार केला. बळजबरीने सिगारेट ओढण्यास लावी. संबंध ठेवण्यापूर्वी गळ्यातील तुळशीमाळ आणि हातातील धागे तोडून टाकत ‘मला मुस्लिम रिवाजाप्रमाणे ‘गजवा-ए-हिंद’ करायचे आहे’ असे बोलून तिला धर्मातराकरिता धमकावले.
या प्रकरणातील संशयित तांजीर इनामदार याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. आमणे यांच्या बदलीनंतर गुन्ह्याचा तपास निरीक्षक सुनील पवार यांच्याकडे आला आहे. याप्रकरणी 18 एप्रिल 2026 रोजी नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
