भुसावळात फाटकी नोट दिल्याच्या वादातून तुंबळ हाणामारी : दुकानदार जखमी


Violent Brawl in Bhusawal Over Dispute Involving Torn Currency Note ; Shopkeeper Injured भुसावळ (28 एप्रिल 2026) : ग्राहकाला फाटकी नोट का दिली ? या किरकोळ वादातून शहरातील दुकानदाराला दोन आरोपींसह आठ अनोळखींनी बेदम मारहाण केली तसेच डोक्यात लोखंडी पाईप टाकून गंभीर दुखापत करण्यात आली. ही धक्कादायक घटना 27 रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शहरातील जामनेर रोडवरील साक्षी ऑटो पार्ट्स या दुकानात घडली.

असे आहे प्रकरण
अजय कन्हैयालाल माखीजा (सिंधी कॉलनी, भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी साडेसात वाजेच्या सुमारास आरोपीने फाटकी नोट मला का दिली? यावरून विचारणा करीत गोंधळ घातला व संशयीत ठाणसिंग मेहरे (पूर्ण नाव अज्ञात) व त्यांचा मुलगा मोहित ठानसिंग मेहरे (20, रा. शिवपूर कन्हाळा) यांच्यासह अन्य 7 ते 8 जणांनी बेदम मारहाण केली. आरोपींनी लोखंडी पाईप डोक्यात मारल्याने दुकानदार जखमी झाला तर अन्य आरोपींनी चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. तपास सहाय्यक फौजदार जयेंद्र पगारे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !