धरणगाव तालुक्यात भीषण अपघात : नववधूसह तिघे ठार

धावत्या क्रुझरचे चाक निखळल्याने अपघात ; सहा जण गंभीर


Horrific Accident in Dharangaon Taluka: Three Dead, Including a Newlywed Bride धरणगाव (29 एप्रिल 2026) : लग्नानंतर माहेरी निघालेल्या नववधूच्या वाहनाला धरणगाव तालुक्यात भीषण अपघात झाल्याने नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात सहा जण जखमी असून त्यांच्यावर शर्थीचे उपचार सुरू आहेत. धरणगाव तालुक्यातील वराडजवळ क्रुझरचे चाक निखळल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.

नववधूसह तिघे ठार
सूत्रांच्या माहितीनुसार, अकोला येथील रहिवासी पूजा रवी वागडकर (22) हिचा विवाह नुकताच गुजरात राज्यातील वापी येथे नुकताच झाला व लग्नानंतर पहिल्यांदाच नववधू आपल्या नातेवाईकांसह माहेरी अकोल्याला परतत असताना बुधवार, 29 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास क्रुझर गाडी (क्रमांक एम.एच.30 झेड 4710) चे गाडीचे एक चाक निखळून वाहन उलटले. धरणगाव तालुक्यातील वराड गावाजवळ हा अपघात घडला.

अपघातात तिघे ठार
या भीषण अपघातात नववधू पूजा रवी वागडकर, दत्तू तुळशीराम भागवत (42) आणि जगदीश चंद्रभान वागडकर (वय 52) या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर प्रेम भारत वाकडकर (24), नितेश सुरेश काठोडे (35), अमोल दामोदर गीते (35), रवी प्रभाकर वाघोडकर (32), तुळशीराम भीमराव भागवत (67) आणि 14 वर्षीय बालक अंश नितेश काठोडे जखमी झाले. जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !