भुसावळातील हवालदार विजय नेरकर, हवालदार सुरज पाटीलसह जळगाव दलातील 27 कर्मचार्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर
उद्या महाराष्ट्र दिनी प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्हासह होणार गौरव
भुसावळ (30 एप्रिल 2026) : जळगाव जिल्हा पोलीस दलातील पोलीस नाईक ते सहायक फौजदार प्रवर्गातील 27 कर्मचार्यांना पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र जाहीर केले आहे. उद्या शुक्रवार, 1 मे महाराष्ट्र दिनी त्यांना हे सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र सन्मानपूर्वक दिले जाणार आहे. भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील हवालदार विजय बळीराम नेरकर तसेच भुसावळ उपअधीक्षक कार्यालयातील हवालदार सुरज पाटील आदींना हे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.
भुसावळातील कर्मचार्यांवर अभिनंदनाचा वर्षाव
भुसावळ पोलीस दलातील हवालदार विजय बळीराम नेरकर, हवालदार सुरज पाटील यांनी चोरीघरफोड्यांसह विविध क्लीष्ट गुन्ह्यांची उकल केली तसेच हवालदार सुरज पाटील यांनी सुरतहून भुसावळात येणार्या बनावट खव्याचे सिंडीकेट उद्ध्वस्त केले होते. भुसावळ पोलीस दलातील पोलीस महासंचालकांचे पदक जाहीर झालेल्या कर्मचार्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

जळगाव दलातील 27 कर्मचार्यांना सन्मानचिन्ह
जळगाव पोलीस दलातर्फे 72 जणांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असलातरी 27 जणांना हे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये विविध प्रकारच्या प्रवर्गातील अधिकारी व कर्मचार्यांना त्यांनी केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल महाराष्ट्र दिनी मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान दिला जातो. पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झालेल्या सर्व अधिकारी व अंमलदारांचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
जळगाव पोलीस दलात यांना सन्मान चिन्ह जाहीर
सहायक फौजदार भरतसिंग प्रल्हाद पाटील, दिलीप मेघराज जाधव, शामकांत दिनकर सोनवणे, सलीम खान बशारत खान, मीनाक्षी दिलीप सावळे, सखाराम छबूराव सकट, अफजल युसुफ खान, विठ्ठल शंकर फुसे, रवींद्र सर्जेराव गायकवाड, अनिल भाऊराव चौधरी (चालक सहायक फौजदार), मो.सलीम शेख मुसा पिंजारी (चालक सहायक फौजदार).
तसेच पोलीस हवालदार अशोक दौलत अहिरे, संदीप रमेश पाटील, किरण निंबालाल धमके, विद्या हरिलाल पाटील, विजय बळीराम नेरकर, संदीप भिकन पाटील, राहुल भीमराव सोनवणे, सुरज मधुकर पाटील, नितीन प्रकाश बाविस्कर, विजय गोरखनाथ पाटील, अकरम याकुब शेख, इरफान यासीन मलिक तसेच पोलीस नाईक अश्विन साहेबराव हडपे, अतुल संतोष चौधरी, सचिन रमेश सोनवणे, संदीप अशोक नन्नवरे
