भुसावळातील पोलीस हवालदार सुरज पाटील यांचा पोलीस महासंचालक पदक लावून पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव
Police Constable Suraj Patil of Bhusawal was honored with the Director General of Police Medal at the hands of the Guardian Minister भुसावळ (2 मे 2026) : भुसावळ पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील हवालदार सुरज पाटील यांचा महाराष्ट्रदिनी पोलीस महासंचालकांचे पदक लावून जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील 27 कर्मचारी व एका उपअधीक्षकांना जिल्ह्यातून पोलीस महासंचालक पदक जाहीर करण्यात आले होते.
उत्कृष्ट कामगिरीची दखल
2027 साली मुंबई पोलीस दलात भरती झालेले सुरत पाटील हे गेल्या 20 वर्षांपासून जिल्हा पोलीस दलात कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांनी एमआयडीसी, आयसीबी, जळगाव, भुसावळ पोलीस उपअधीक्षक कार्यालयात सेवा बजावली आहे. विविध गुन्ह्यांचा तपास करताना त्यांनी चोरी, घरफोडी, दरोडा, मर्डर तसेच फसवणूक सारखे गुन्हे उघडकीस आणले असून त्यांच्या या कामगिरीची दखल घेत त्यांना महासंचालकांचे पदक जाहीर करण्यात आले होते. महाराष्ट्रदिनी जळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री गुलाबराव पाटील, जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्याहस्ते त्यांना सन्मानीत करण्यात आले. त्यांना पदक मिळाल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
