शहादा पोलिसांची मोठी कारवाई : 60 लाखांची अवैध दारू जप्त
Major Action by Shahada Police : Illegal Liquor Worth ₹60 Lakh Seized शहादा (3 मे 2026) : शहादा पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारावर एका वाहनातून तब्बल 60 लाख रुपये किंमतीची अवैध दारू जप्त केल्याने तस्कर हादरले आहेत.
हरियाणातील आरोपींना बेड्या
शहादा निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांना अवैधरित्या मद्य वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शहादा-दोंडाईचा रस्त्यावर नाकाबंदी लावली. संशयीत वाहन (आर.जे.27 जीई 9527) आल्यानंतर चालक जीवनराम होशियारसिंग इटकांड (35) व अजयकुमार जयवीर दडिया (31, हरियाणा) यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी उडवा-उडवीची उत्तर दिल्यानंतर वाहनाची तपासणी केली असता त्यात 60 लाख 12 हजार रुपये किंमतीचे अवैध विदेशी दारुचे 535 बॉक्स आढळल्याने ते जप्त करण्यात आले व संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई शहादा उपअधीक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा निरीक्षक हेमंतकुमार पाटील, एपीआय प्रवीण सोनवणे, हवालदार दीपक चौधरी, भगवान सावळे, कपिल मंदील आदींच्या पथकाने केली