जळगाव जिल्ह्यात पोलिसांतर्फे हॉटेल्ससह ढाब्यांची कसून तपासणी : 11 जणांवर कारवाई, तलवारही जप्त


Intensive Police Checks on Hotels and Dhabbas in Jalgaon District: Action Taken Against 11 Individuals; Sword Also Seized जळगाव (3 मे 2026) : जळगाव जिल्ह्यातील हॉटैल्ससह ढाब्यांवर मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या दारुची विक्री होत असल्याच्या अनुषंगाने व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या टोळ्या या ठिकाणी गुन्ह्यांचे नियोजन करीत असल्याच्या अनुषंगाने पोलिसांनी एकाचवेळी जिल्ह्यातील ढाब्यांसह हॉटेल्सची तपासणी केली. या कारवाईने मद्यपींच्या व गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

213 हॉटेल्ससह ढाब्यांची तपासणी
शनिवार, 2 मे रोजी रात्री 9 ते 11 या वेळेत ही विशेष मोहीम राबविण्यात आली. सर्व पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकार्‍यांना याबाबत सूचना देऊन विशेष पथके स्थापन करण्यात आली होती. या मोहिमेत जिल्हाभरातील बार, 213 हॉटेल व धाब्यांवर अचानक छापे टाकून एकूण दारूबंदी अंतर्गत 116 ठिकाणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एका ठिकाणी एनडीपीएस अंतर्गत कारवाई, दारूबंदी कायद्यांतर्गत 11 प्रकरणे नोंदविण्यात आली तसेच एका इसमाकडून तलवार जप्त करण्यात आली तर दोन अनधिकृत हॉटेलांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना निष्कासित करण्यात आले आहे. याशिवाय 47 इसमांविरुद्ध प्रतिबंधक कारवाई (कलम 112/117 प्रमाणे) करण्यात आली. इतर कारवाईत 4-33/डब्ल्यू प्रमाणे प्रकरणे, मोटार वाहन कायद्यांतर्गत 5 गुन्हे, तसेच एकावर ‘ड्रिंक अँड ड्राइव्ह’ प्रकरण दाखल करण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (चाळीसगाव परिमंडळ) व अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत (जळगाव परिमंडळ) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईत रहावे सातत्य
पोलीस प्रशासनाकडून कारवाई होत असलीतरी ती अल्पकाळासाठी न होता त्यात सातत्य राहण्याची अपेक्षा सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !