भुसावळात चोरटे ‘सैराट’ ; एका रात्रीत तीन रिक्षांच्या बॅटर्‍या चोरी


भुसावळ (3 मे 2026) : शहरात चोरटे सैराट झाले असून एकाच रात्रीत गौसिया नगर परिसरातून तीन मालवाहतूक रिक्षांच्या बॅटर्‍या चोरी चोरट्यांनी लांबवल्याने वाहनधारकांमध्ये भीती पसरली आहे.

तीन ठिकाणी चोरी
शेख आबील शेख खलील पिंजारी (35, रा.गौसिया नगर, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात व मालवाहतूक रिक्षा चालवून आपला व्यवसाय करतात. दिनांक 1 मे 2026 रोजी रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे आपली रिक्षा (क्र. एम.एच.19 सी.डब्ल्यू.-4068) घरासमोर उभी केली होती मात्र दुसर्‍या दिवशी सकाळी रिक्षा सुरू करताना बॅटरी चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

या घटनेनंतर परिसरात चौकशी केली असता, शेख रशीद शेख हमीद (रिक्षा क्र.एम.एच.02 सी.ई.2938) तसेच शेख फरीद शेख रसूल (रिक्षा क्र. एम.एच.19 बी.एम.5361) यांच्या रिक्षांमधील बॅटर्‍याही त्याच रात्री चोरीला गेल्याचे उघड झाले.

चोरीस गेलेल्या बॅटर्‍यांची एकूण किंमत सुमारे 14 हजार 800 रुपये असून, त्यामध्ये एस.एफ. सोनी (5,800 रुपये), ग्लोबल (3,500 रुपये) आणि एक्साईड (5,500 रुपये) या कंपन्यांच्या बॅटर्‍यांचा समावेश आहे. या प्रकरणी तिघांनीही पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार नोंदवली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !