मुक्ताईनगर तालुक्यात भीषण अपघात : कोचूरचे दाम्पत्य ठार, चिमुकला बचावला
Horrific Accident in Muktainagar Taluka : Couple from Kochur Killed ; Young Child Survives मुक्ताईनगर (4 मे 2026) : भरधाव आयशर गाडीने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर सुदैवाने एक वर्षीय बालक बचावले. हा भीषण अपघात मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी फाटा, मरिमाता मंदिराजवळ सोमवारी सकाळी आठ वाजता घडला. गजानन हिरामण पाटील व त्यांची पत्नी अश्विनी गजानन पाटील अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. मयत हे रावेर तालुक्यातील कोचूर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
पोलिसांची अपघातस्थळी धाव
या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे.
