भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ : न्यायालयाने सुनावली 9 मे पर्यंत पोलीस कोठडी


Troubles Mount for Imposter Ashok Kharat : Court Remands Him to Police Custody Until May 9 नाशिक (5 मे 2026) : नाशिकमधील अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी भोंदू अशोक खरातला शिर्डी पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यास मंगळवारी राहाता सत्र न्यायालयात हजर केले असता त्यास 9 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

प्रचंड बंदोबस्तात आरोपी हजर
जमीन खरेदी आणि अवैध सावकारी प्रकरणी शिर्डी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आरसीपी तुकडीसह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या प्रकरणातील गुंतागुंत पाहता, आरोपीने केलेल्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्यासाठी पोलिसांनी त्याला न्यायालयात सादर केले. तसेच आता अशोक खरातच्या पोलिस कोठडीत वाढ झाली असून आता 9 मे पर्यंत त्याला पोलिस कोठडीत ठेवण्यात येणार आहे.



रॅकेटचा पर्दाफाश होण्यासाठी मागितली कोठडी
सुनावणी दरम्यान सरकारी वकील अ‍ॅड.गौरव बोर्डे यांनी जोरदार युक्तिवाद करत आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. आरोपीने जमीन खरेदीसाठी लागणारी कोट्यवधींची रक्कम नेमकी कुठून आणली आणि हे व्यवहार कोणाच्या मदतीने केले, याचा शोध घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तपासात खरातचे नाव नॉमिनी असलेली अनेक बँक खाती विविध पतसंस्थांमध्ये आढळली असून, त्यातून मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी सखोल तपासाची गरज व्यक्त करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !