बस-स्कॉर्पिओत भीषण अपघात : चौघे जागीच ठार


Horrific Accident Involving Bus and Scorpio : Four Killed on the Spot ठाणे (5 मे 2026) : बस आणि स्कॉर्पिओ कारमध्ये भीषण अपघात झाल्याने त्यात स्कॉर्पिओमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला तर चौघे प्रवासी गंभीर जखमी झाले. विठ्ठलवाडी-कल्याण-आहिल्यानगरला जाणारी बस आणि स्कॉर्पिओ गाडीची धडक बसल्याने हा अपघात घडला. ओव्हरटेकच्या प्रयत्नात अपघात घडल्याचे सांगण्यात आले.

चौघे जागीच ठार
कल्याण-आहिल्यानगर महामार्गावरील वैशाखरे टोकावडे येथे विठ्ठलवाडी आगारातून कल्याण-अहिल्यानगरसाठी निघालेल्या बसची स्कार्पिओ कारसोबत धडक होऊन अपघात झाला. अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केले होते.



मुरबाड-माळशेज घाट महामार्गावरील वैशाखरे वळणावर मंगळवारी झालेल्या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये दोन मुलांचा समावेश आहे, त्यांच्यावर जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कल्याणहून अहिल्यानगरच्या दिशेने जाणारी एस.टी.बस वैशाखरे येथील वळणावर आली असताना समोरुन येणार्‍या स्कॉर्पिओसोबत तिची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा चुराडा झाल्याचं व्हिडिओ आणि फोटोंमधून दिसून येते.

दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार, कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील वैशाखरे वळणाजवळ ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !