निरीक्षकपदी प्रमोशनवर बदली मात्र 28 लाखांची लाच भोवली : लाचखोर महिला अधिकार्‍याचे अखेर निलंबन


Transferred on Promotion to Inspector Post, But 28-Lakh Bribe Proves Costly: Corrupt Female Officer Finally Suspended पुणे (6 मे 2026) : सहाय्यक निरीक्षकांची प्रमोशनवर पोलीस निरीक्षकपदी बदली होवून त्या कार्यमुक्तही झाल्या मात्र 28 लाखांची ऑफर आल्यानंतर त्या मोहाला बळी पडल्या व एसीबीच्या जाळ्यात अडकल्या. या गंभीर बाबीची दखल घेत सहायक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार यांना पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी काढल्यानंतर पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

असे आहे लाच प्रकरण
आर्थिक गुन्हे शाखेत सहाय्यक निरीक्षक वैशाली तोटेवार कार्यरत होत्या मात्र पदोन्नतीने मुंबई लोहमार्ग पोलीस दलात पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाल्यानंतर त्यांना कार्यमुक्त करण्यात आले तर जमिनीच्या एका प्रकणातील तक्रार अर्ज त्यांच्याकडे चौकशीसाठी सोपविण्यात आल्यानंतर तोटेवार यांनी तक्रारदाराकडे जाता-जाता 30 लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने सुरुवातीला दोन लाख रुपये दिले होते. उर्वरित 28 लाख रुपयांची लाच देण्याचा तोटेवार यांचा आग्रह होता मात्र तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार दिली होती.



आधी खाजगी पंटर व नंतर अधिकारी जाळ्यात
लाचेची रक्कम घेऊन तक्रारदाराला शनिवार, 2 मे रोजी दुपारी बंडगार्डन रस्त्यावरील एका पंचतारांकित हॉटेलजवळ बोलावल्यानंतर ही रक्कम स्वीकारण्यासाठी तोटेवार यांनी संभाजी शिवाजी चव्हाण (47, रा. चिमण्या गणपती चौक, सदाशिव पेठ ) यांना पाठविले.. चव्हाण हा तोटेवार यांच्या ओळखीचा असून तक्रारदाराकडून लाच घेताना चव्हाणला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून पकडले. चौकशीत तोटेवार यांनी लाच घेण्यासाठी पाठविल्याचे उघड झाल्यानंतर तोटेवार यांच्यासह चव्हाण याला अटक करण्यात आली. तोेटेवार आणि चव्हाण यांना न्यायालायने 6 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश आहेत.

कार्यमुक्तचा आदेश रद्द : अखेर निलंबन
बदलीनंतर तोटेवार यांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतून कार्यमुक्त करण्यात आले होते मात्र तोटेवार यांना कार्यमुक्त करण्याचा आदेशही रद्द करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक पदावरुन त्यांना निलंबित करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !