महिला मंडळ अधिकारी 50 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात


Female Mandal Officer Caught in ACB Trap While Accepting Bribe of ₹50,000 नाशिक (6 मे 2026) : न्यायालयाच्या निर्णयानुसार मूळ रेकॉर्ड व कब्जा देणेबाबत कारवाई करण्यासाठी 50 हजारांची लाच घेताना मंडळ अधिकारी योगीता आनंद भोये (38) यांना नाशिक एसीबीने अटक केल्याने लाचखोर हादरले आहेत.

असे आहे लाच प्रकरण
तक्रारदाराचा खडक ओझर शिवारात वडिलोपार्जित जमीन आहे. शेतीच्या कब्जाबाबत वाद निर्माण झाल्याने त्यांनी न्यायालयात दावा दाखल केला असून न्यायालयाच्या निर्णयानुसार तक्रारदाराला कब्जा देण्याबावत महसूल विभागास आदेशित केले होते. चांदवडच्या तहसीलदारांनी जोपुळ, ता.चांदवड येथील मंडळाधिकारी योगीता भोये यांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले मात्र भोये यांनी स्वतःसह तलाठ्याच्या नावे काम करून देण्याच्या मोबदल्यात 60 हजारांची लाच मागून 50 हजारांवर तडजोड केली. तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर मंगळवारी सायंकाळी सापळा रचण्यात आला व लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली व वडनेर भैरव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.



यांनी केला सापळा यशस्वी
पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी, हवालदार विनोद चौधरी, अनिल गांगोडे, प्रमोद चव्हाणके आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !