महिलांनो प्रवासात दागिने सांभाळा : भुसावळातील महिलेचे 26 तोळे वजनाचे दागिने लांबवले


Women, Guard Your Jewelry While Traveling : 26 Tolas’ Worth of Jewelry Stolen from Woman in Bhusawal भुसावळ (6 मे 2026) : भुसावळ-रावेर एसटी बस प्रवासादरम्यान एका महिलेच्या बॅगेतील तब्बल 26 तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आजच्या बाजारमूल्यानुसार सुमारे 39 लाखांचे हे दागिणे होत असलेतरी दागिणे जुने असल्याने त्या मूल्यानुसार सहा लाख 70 हजार रुपये किंमतीचे दागिने लांबवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

अनोळखींना बॅग देताच चोरट्यांना मिळाली संधी
बाजारपेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नंदा सुरेश गोराडकर (59, रा. श्रीराम नगर, भुसावळ, सध्या पुणे) या आपल्या नातेवाईकांच्या लग्नासाठी भुसावळात आल्या होत्या. शनिवार, 2 मे रोजी सकाळी सुमारे 8.30 वाजता भुसावळ बसस्थानकावरून रावेरकडे जाणार्‍या एसटी (क्रमांक एम.एच. 20/1766) बसमध्ये त्या बसल्या.
बसमध्ये गर्दी असल्याने त्यांनी सोन्याच्या दागिन्यांची बॅग दोन अनोळखी व्यक्तीकडे दिली. संबंधितांनी ती बॅग चालकाजवळ ठेवली. नंतर जागा मिळाल्यानंतर त्यांनी बॅग परत घेतली मात्र त्यावेळी दागिन्यांची खात्री केली नाही.



रावेरात चोरीचा प्रकार उघडकीस
रावेरात पोहोचल्यानंतर बॅग उघडून पाहिली असता त्यातील सर्व दागिने चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणात एका संशयित व्यक्तीने फैजपूर येथे तर दुसर्‍याने रावेर येथे बसमधून उतरल्याची माहिती समोर आली आहे. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये सुमारे 26 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असून त्यांची एकूण किंमत अंदाजे 6 लाख 70 हजार रुपये इतकी आहे. यात बांगड्या, पाटल्या, नेकलेस, पोत, हार, अंगठ्या व कानातील दागिन्यांचा समावेश आहे.

या घटनेनंतर फिर्यादीने नातेवाईकांना माहिती दिली व भुसावळ बाजारपेठ पोलिसात मंगळवार. 5 मे रोजी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !