सुनसगावात धाडसी घरफोडी ; 41 हजारांचा मुद्देमाल लंपास


Audacious Burglary in Sunsagav; Valuables Worth ₹41,000 Stolen भुसावळ (6 मे 2026) : भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथे चोरट्याने घरफोडी करीत 41 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात मंगळवार, 5 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ही घरफोडी गावातीलच अजिंक्य राजेंद्र चौधरी (सुनसगाव) याने केल्याचा संशय फिर्यादीत व्यक्त करण्यात आला आहे.

वडिलोपार्जित दागिने लांबवले
तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिलीप मुरलीधर पाटील (69, व्यवसाय शेती, सध्या रा. नाशिक रोड, नाशिक; मूळ रा. सुनसगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सुनसगाव येथील त्यांच्या घर क्रमांक 169 च्या वरच्या मजल्यावरील घरात 1 ऑक्टोबर 2025 ते 4 मे 2025 दरम्यान ही चोरी झाली. संशयीताने घराच्या दरवाजाची कडी उघडून आत प्रवेश करीत घरातील तांबे, पितळ व कासेची भांडी तसेच दोन लोखंडी खाटा असा एकूण सुमारे 41 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.



या प्रकरणी अजिंक्य राजेंद्र चौधरी (रा. सुनसगाव, ता. भुसावळ) याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल धीरज मंडलीक करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !