जन्म दाखल्यांसाठी तीन हजारांची लाच : जामखेड पालिकेतील दोन्ही कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात


गणेश वाघ
Bribe of ₹3,000 for Birth Certificates : Both Employees at Jamkhed Municipality Caught in ACB Trap भुसावळ (6 मे 2026) : मुला-मुलीचा जन्म दाखला देण्यासाठी तीन हजारांची लाच मागून ती स्वीकारताना अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड पालिकेतील दोन कर्मचार्‍यांना अहिल्यानगर एसीबीने बुधवारी सायंकाळी अटक केली आहे. या कारवाईने लाचखोर हादरले आहेत.

जामखेड पालिकेतील जन्म मृत्यू नोंदणी विभागाचा लिपिक अभिजीत जालम भेसडे (39, तपनेश्वर गल्ली, मारुती मंदिरासमोर, जामखेड, जि.अहिल्यानगर) व अग्निशमन दलातील मदतनीस अहमद इलियास शेख (43, काजी गल्ली, मशीदीसमोर, खर्डा रोड, जामखेड, अहिल्यानगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.



असे आहे लाच प्रकरण
तक्रारदाराने मुला-मुलीच्या जन्म दाखल्यासाठी अर्ज दिल्यानंतर संशयीतांनी प्रति दाखल 1500 रुपये प्रमाणे लाच मागितली व तीन हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर एसीबीकडे 5 रोजी तक्रार देवून 6 रोजी सापळा रचण्यात आला. शेख यांनी लाच स्वीकारताच भैसडे यांनाही अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
उपअधीक्षक अजित त्रिपूटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू आल्हाट, नाईक चंद्रकांत काळे, किशोर कुळधर, शेखर वाघ, चालक दशरथ लाड आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !