भुसावळात उष्माघाताने नांदेडच्या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू
भुसावळ (9 मे 2026) : शहरात वाढत्या उष्णतेचा फटका बसत असल्याने उष्माघातामुळे एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरूवारी समोर आली. कुमुदिनी सुधाकर पाटील (73, रा. शास्त्रीनगर, नांदेड ) असे मृताचे नाव आहे.
उष्मतेने मृत्यू !
कुमुदिनी पाटील सावदा येथे लग्नानिमित्त नातेवाईकांकडे आल्या होत्या. त्यानंतर त्या भुसावळातील तापी नगर परिसरात नातेवाईकांकडे गेल्या होत्या. गुरुवारी दुपारी शहरातील तीव्र उष्णतेदरम्यान अचानक त्यांना बेशुद्ध पडल्या. घटनेनंतर नातेवाईकांनी तातडीने त्यांना उपजिल्हा रुग्णालय तथा ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल केले मात्र रस्त्यावर चक्कर आली आणि त्या वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.


प्राथमिक माहितीनुसार, उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पंकज सुरेश पाटील यांच्या माहितीवरून शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक इकबाल सव्यद करीत आहेत.
