भुसावळात कत्तलीपूर्वीच नऊ गोवंशाची सुटका : चौकडीविरोधात गुन्हा
Nine Cattle Rescued in Bhusawal Before Slaughter: Case Registered Against Four Individuals भुसावळ (10 मे 2026) : शहरातील आगाखानवाड्यात गोवंशाची कत्तल होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी छापा टाकत नऊ जिवंत गोवंशांची सुटका केली. या प्रकरी दोघांना अटक करण्यात आली तर चौकडीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
शुक्रवार, 9 मे रोजी सकाळी सुमारे 7.50 ते 10 वाजेदरम्यान पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी मुस्ताक खान रहीम खान (47) व सैय्यद असरद गफार (34, दोघेही रा.आगाखानवाडा, भुसावळ) हे गोवंशाची कत्तल करताना आढळून आले. त्यांच्या साथीदारांपैकी 2 ते 3 जण घटनास्थळावरून पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.


नऊ गोवंशाची सुटका : साधने जप्त
या छाप्यात पोलिसांना कत्तल केलेल्या गोवंशाचे मांस, डोके तसेच कत्तलीसाठी वापरण्यात येणारी साधने आढळली तर 9 जिवंत गोवंश बांधून ठेवलेले आढळल्याने त्यांची सुटका करीत त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. पोलिसांनी कत्तल केलेले मांस, हातगाडी, कोयते, कुर्हाडी, चाकू व इतर साहित्य असा एकूण सुमारे दोन लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
संशयीताविरोधात गुन्हा
हवालदार नितीन दगडू सपकाळे यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल वाघ, उपनिरीक्षक मंगेश जाधव, पथक व पशू वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप वाजे आदींनी केली.
