कर्तव्यात कसुरी करणार्या कर्मचार्यांना जळगाव पोलीस अधीक्षकांचा दणका : निलंबनानंतर दोघांना मुख्यालयी हलवले
Jalgaon Superintendent of Police Cracks Down on Employees Neglecting Duty: Two Transferred to Headquarters Following Suspension जळगाव (10 मे 2026) : जळगावचे नूतन पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांची शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ख्याती आहे. चांगल्या अधिकारी, कर्मचार्यांच्या पाठीशी ते सदैव असलेतरी कामचुकारपणा करणार्यांची ते गय करीत नाही, हा अनुभव नेहमीच नागरिकांना येतो. निष्काळजीपणा आणि शिस्तभंग केल्याच्या प्रकरणात जळगावातील दोन कर्मचार्यांना तातडीने निलंबित करीत कंट्रोल अॅटॅच करण्यात आल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली.
असे आहे प्रकरण ?
8 मे 2026 रोजी रात्री सुमारे 9.20 वाजता राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय जळगाव यांनी पोलीस अधीक्षक बंगल्यावरील गार्ड ड्युटीचे अचानक निरीक्षण केले. यावेळी गार्ड ड्युटीवर नियुक्त असलेले एएसआय संभाजी निबाजी पाटील व नाईक प्रदीप भगतसिंग राजपूत हे दोघेही आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले.


तपासणीदरम्यान आणखी धक्कादायक बाब समोर आली. गार्ड रूममध्ये ठेवण्यात आलेल्या तीन एसएलआर रायफल्सपैकी बट नं. 82.262.882 असलेली रायफल दारू गोळ्याविना आणि कोणतीही सुरक्षा व्यवस्था न ठेवता बेवारस अवस्थेत आढळून आली. संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारची निष्काळजीपणा गंभीर मानण्यात आला व शस्त्रास्त्रांच्या सुरक्षिततेबाबत मोठा प्रश्न उपस्थित झाला.
पोलीस प्रशासनाच्या माहितीनुसार, संबंधित दोन्ही अंमलदारांचे वर्तन महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 मधील नियम 3 चे उल्लंघन करणारे आहे. पोलीस अधीक्षकांनी तातडीने कारवाई करत दोघांनाही शासकीय सेवेतून निलंबित केले आहे.
निलंबन कालावधीत दोन्ही अंमलदारांचे मुख्यालय पोलीस मुख्यालय, जळगाव येथेच राहणार असून वरिष्ठ अधिकार्यांच्या पूर्व परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली. नूतन अधीक्षकांच्या या कारवाईचा जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचार्यांनी चांगलाच धसका घेतला आहे.
