मयत सभासदांच्या नावाने धान्य उचलून दहा लाखांचा अपहार : अमळनेरच्या दोघा रेशन दुकानदारांविरोधात गुन्हा
Embezzlement of ₹10 Lakhs by Drawing Funds in the Names of Deceased Members: Case Registered Against Two Ration Shopkeepers in Amalner अमळनेर (15 मे 2026) : मयत सभासदांच्या नावे धान्य उचलून 2012 ते 2016 दरम्यान सुमारे नऊ लाख 62 हजार 208 रुपये किंमतीच्या गव्हासह तांदळाचा अपहार केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशाने तालुक्यातील दहिवच्या दोन रेशन दुकांदारांनविरुद्ध जीवनावश्यक वस्तू सेवा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण ?
दहिवद येथील रमेश काशीनाथ पाटील व कोकिळाबाई वासुदेव माळी यांनी दुकान क्रमांक 145 व 146 मध्ये 2012-2016 दरम्यान अंत्योदय लाभार्थी सुमनबाई मच्छिंद्र पाटील, गुणवंताबाई आत्माराम माळी, सोनाबाई देवचंद माळी या मयत लाभार्थींच्या नावे अंत्योदय व बीपीएल धान्य योजनेतून धान्य उचलले तसेच मंजूर क्षमतेपेक्षा जास्त 13 लाभार्थींची नावे वाढवून त्यांच्या नावेदेखील गहू, तांदूळ उचलून अपहार केला. याबाबत श्यामकांत जयवंतराव पाटील यांनी तक्रारी करून पुरावे दाखल केल्यानंतर दुकानांचे परवाने रद्द झाले होते.
असा झाला अपहार
रमेश पाटील यांनी अंत्योदय योजनेचे 85 हजार 334 रुपयांचे 2240 किलो गहू तांदूळ, बीपीएल योजनेचे 3 लाख 66 हजार 412 रुपयांचे 9 हजार 600 किलो गव्हासह तांदुळाचा अपहार केला तर कोकीलाबाई वासुदेव माळी यांनी मनकरणाबाई दगडू शेटे मयत असताना त्यांच्या नावे धान्य उचलले काहींची नावे बीपीएल यादीत नसताना असा 16 लोकांच्या नावे धान्य उचलले , काहींना नियंप्रमाणे धान्य वाटप केले नाही असा त्यांनी 70 हजार 667 रुपयांचा 1855 किलो गहू तांदळाचा अंत्योदय योजनेत तर बीपीएल योजनेत 4 लाख 39 हजार 996 रुपये किमतीचा 11 हजार 520 किलो गहू तांदुळाचा अपहार केला आहे. दोन्ही मिळून 9 लक्ष 62 हजार 108 रुपयांचा अपहार केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर गुन्हे दाखल होण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या आदेशाने अमळनेर पोलीस स्टेशनला पुरवठा निरीक्षण अधिकारी रुकसाना जमाल शेख यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.



