कमी दिवस, कमी वजनाच्या शिशूचे वाचले प्राण

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महा व रुग्णालयातील बालरोग तज्ञांची कामगिरी


जळगाव (15 मे 2026) : मुदतपूर्व प्रसूतीमुळे जन्मलेल्या कमी दिवसांच्या आणि अत्यंत कमी वजनाच्या नवजात शिशूवर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील एनआयसीयू विभागात यशस्वी उपचार करण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या वेळेवर केलेल्या उपचारांमुळे या शिशूची प्रकृती सुधारून त्याला नवजीवन मिळाले आहे.

मुदतपूर्व प्रसूती
किशोर इंगळे (रा. रावेर) यांच्या पत्नीला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्याने तिची मुदतपूर्व प्रसूती करण्यात आली. प्रसूतीनंतर जन्मलेले शिशू अत्यंत कमी वजनाचे होते. तसेच श्वसनास त्रास, अशक्तपणा आणि शरीरातील आवश्यक कार्ये व्यवस्थित न होणे अशा गंभीर समस्या दिसून आल्या. त्यामुळे शिशूची प्रकृती चिंताजनक बनली होती. शिशूला तातडीने डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील अत्याधुनिक एनआयसीयू (नवजात अतिदक्षता विभाग) मध्ये दाखल करण्यात आले. नवजात शिशू तज्ज्ञ डॉ. सुयोग तन्नीरवार यांनी शिशूची सखोल तपासणी केली. तपासणीअंती शिशूचे वजन अत्यल्प असल्याने त्याच्यावर विशेष निगराणीखाली उपचार सुरू करण्यात आले. एनआयसीयूमध्ये शिशूला आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यात आल्या.







शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे, श्वसनासाठी आवश्यक मदत, संसर्गापासून संरक्षण, तसेच योग्य प्रमाणात पोषण देण्यावर विशेष भर देण्यात आला. डॉक्टर आणि परिचारिका यांच्या सततच्या देखरेखीमुळे शिशूमध्ये हळूहळू सकारात्मक बदल दिसू लागले.उपचाराच्या पहिल्याच आठवड्यात शिशूच्या वजनात वाढ होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर नियमित उपचार, पोषण व्यवस्थापन आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे महिनाभरात शिशूची प्रकृती लक्षणीयरीत्या सुधारली. सध्या शिशू पूर्णपणे सुरक्षित असून त्याला घरी सोडण्यात आल्याची माहिती रूग्णालय प्रशासनाने दिली. या उपचारासाठी डॉ. कुशल धांडे, डॉ. ओमश्री गुडे, डॉ. विशाल कोठावदे, डॉ. अस्मिता गायकवाड, डॉ. सृष्टी भिरूड, भारती झोपे यांनी सहकार्य केले.

तातडीने मिळाले योग्य उपचार
मुदतपूर्व जन्मलेल्या आणि कमी वजनाच्या शिशूंमध्ये अनेक गुंतागुंती निर्माण होण्याची शक्यता असते. अशा वेळी तातडीने योग्य उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. या शिशूवर एनआयसीयूमध्ये अत्याधुनिक पद्धतीने उपचार करण्यात आले. डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि पालकांच्या सहकार्यामुळे शिशूची प्रकृती सुधारण्यास मदत झाल्याचे रुग्णालयाच्या डॉ.ओमश्री गुडे म्हणाल्या.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !