भुसावळ हादरले : एमपीतील तरुणीवर अत्याचार ; जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा आरोप
संशयीत आरोपीला अटक : हिंदूत्ववादी संघटना संतप्त ः कठोर कारवाईची मागणी
गणेश वाघ
Bhusawal Shaken : Atrocities Committed Against Young Woman from MP; Allegations of Forced Conversion भुसावळ (17 मे 2026) : मध्यप्रदेशातील मूळ रहिवासी व भुसावळस्थित आजोबांकडे शिक्षणासाठी आलेल्या 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला तसेच जबरदस्तीने तिचे धर्मांतर करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडीतेने तक्रार दिल्यानंतर याबाबतचा गुन्हा सिवनी मालवा, जि.नर्मदापूरम ठाण्यात दाखल करण्यात आल्यानंतर तो भुसावळ बाजारपेठ पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. संशयीत आरोपी नवील शेख (भुसावळ) यास अटक करण्यात आली आहे.
असे आहे प्रकरण
पीडीता मूळची मध्यप्रदेशातील रहिवासी असून ती दहावीत शिक्षणासाठी आजोंबाकडे भुसावळात आली होती व शिक्षणादरम्यान तिची संशयीत आरोपीसोबत ओळख होवून मैत्री झाली. या दरम्यान उभयंतांच्या एका कॅफेमध्ये भेटीगाठीदेखील झाल्या व यावेळी आरोपीने पीडीतेचा कॅमेर्यात फोटोदेखील काढला व लग्न करण्याची इच्छा केली मात्र पीडीतेने दोघांचे धर्म भिन्न असल्याने लग्नास नकार दिला.
फोटो व्हायरलची धमकी अन अत्याचार
पीडीता आजोळी भुसावळात आल्यानंतर 16 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी संशयीताने तिला फोन केला व भेटण्यासाठी बोलावले व न आल्यास कुटूबियांना मारण्याची धमकी देत सोबत काढलेले फोटो व्हायरलची धमकी दिली. आरोपीने सुंदरनगर परिसरातील एका खोलीवर नेत पीडीतेवर तीन ते चार वेळा अत्याचार केला.
जबरदस्तीने धर्मांतराचा आरोप
पीडीतेच्या तक्रारीनुसार, 7 मार्च 2026 रोजी आरोपीने 8 रोजी पहाटे 5.30 वाजता तयार राहण्यास सांगितले व सोबत लग्नासाठी न आल्यास कुटूंबाला संपवण्याची धमकी दिली. यावेळी पीडीता घाबरून सुंदर नगरातील रूमवर आरोपीसोबत पोहोचली व दुसर्या दिवशी आरोपीने दीपनगरातील एका रूमवर नेले. यावेळी तिथे मौलाना उपस्थित होते व त्यांनी आपल्याला कलमा पढण्यास सांगितले व आपण नकार दिल्यानंतर आरोपी नवीलने कलमा न पढल्यास येथेच जिवंत मारेल, अशी धमकी दिल्याने पीडीतेने कलमा पढला व मुस्लीम रितीरिवाजानुसार लग्नविधी पार पडला. त्यानंतर आरोपीने सुंदर नगरातील खोलीवर आठ दिवस आपल्याला ठेवले. आरोपी आपल्याला बुरखा घालण्यासाठी जबरदस्ती करीत होता शिवाय तसे न केल्यास मारहाणही करीत होता. यावेळी पीडीतेची आरएस, बजरंग दल आणि कुटुंबीयांच्या मदतीने सुटका केल्यानंतर ती मूळ गावी पोहोचली.
सिवनी मालवा पोलिसात गुन्हा
पीडीतेने 10 मे 2026 रोजी सिवनी मालवा महिला हेल्प डेस्क येथे लेखी तक्रार दिली. सिवनी मालवा पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपासासाठी तो भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात आरोपी नविल शेखविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 64(2)ा, 127(3), 351(3), 115(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारती काळे करीत आहे. दरम्यान, याप्रकरणी संशयित आरोपी नविल शेख यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.










