एका फोन कॉलने वाचला संपादकाचा जीव ; महादेव हॉस्पिटलच्या तत्परतेने मिळाले नवजीवन


जळगाव (23 मे 2026) : घाम खूप येतोय खांदा दुखतोय छातीत असह्य वेदना होत आहेत सकाळी साडेआठ वाजता आलेला हा फोन केवळ मदतीचा नव्हता, तर मृत्यूशी सुरू असलेल्या झुंजीचा आर्त आवाज होता. मात्र योग्य वेळी घेतलेला निर्णय, डॉक्टरांची तत्परता आणि महादेव हॉस्पिटलच्या सज्जतेमुळे एका संपादकाला अक्षरशः नवजीवन मिळाले.

पीआरओ यांची सतर्कता
शहरातील महादेव हॉस्पिटल येथे आयोजित हृदयविकार तपासणी शिबिरादरम्यान ही थरारक घटना घडली. सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी जनसंपर्क अधिकारी राहुल कुलकर्णी यांच्या मोबाईलवर संपादक निलकंठ वाणी यांचा फोन आला. फोनवरील आवाज घाबरलेला होता. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या, खांदा आणि छातीत तीव्र वेदना सुरू होत्या.क्षणाचाही विलंब न करता राहुल कुलकर्णी यांनी ही गंभीर हृदयविकाराची लक्षणे असल्याचे ओळखले आणि तात्काळ महादेव हॉस्पिटलमध्ये या, असा सल्ला दिला.





दुसरीकडे, रुग्णालयाचे प्रशासक एन.जी.चौधरी यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत संपूर्ण यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवली.रुग्ण हॉस्पिटलमध्ये पोहोचताच हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सिद्धेश खांदे यांनी तातडीने ईसीजी केले. अहवाल पाहताच रुग्णाला गंभीर स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका आल्याचे स्पष्ट झाले. तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. रक्तदाब नियंत्रणात आल्यानंतर अँजिओग्राफी करण्यात आली. त्यामध्ये हृदयातील मुख्य रक्तवाहिनी 99 टक्के ब्लॉक असल्याचे निदर्शनास आले.मृत्यू प्रत्येक क्षणी जवळ येत असताना डॉक्टरांनी वेळ न दवडता अँजिओप्लास्टी केली आणि यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन मिळाले.

विशेष म्हणजे, त्या वेळी रुग्णाच्या खिशात एक रुपयाही नव्हता मात्र शासन योजनेचा लाभ मिळवून देत संपूर्ण उपचार मोफत करण्यात आले.रुग्णाच्या कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. जर काही मिनिटे उशीर झाला असता, तर आज चित्र वेगळे असते, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.या प्रसंगानंतर निलकंठ वाणी यांनी भावना व्यक्त करताना सांगितले, असं म्हणतात डॉक्टर हे देवाचं रूप असतं. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने डॉक्टर देवदूत बनून आले आणि माझा जीव वाचवला. त्या सर्व डॉक्टरांचे आणि महादेव हॉस्पिटलचे मी मनःपूर्वक आभार मानतो.

योग्य वेळी उपचाराने टळला अनर्थ
रुग्णाला हॉस्पिटलमध्ये आणण्यात कोणताही विलंब झाला नाही, हीच त्याच्या जीव वाचण्यामागची सर्वात मोठी गोष्ट ठरली. छातीत वेदना, जास्त घाम येणे आणि खांद्यात दुखणे ही हृदयविकाराच्या झटक्याची महत्त्वाची लक्षणे आहेत. ईसीजीमध्ये गंभीर हृदयविकाराचा झटका स्पष्ट झाला होता. अँजिओग्राफीमध्ये हृदयातील मुख्य रक्तवाहिनी 99 टक्के ब्लॉक असल्याचे दिसून आले. तातडीने अँजिओप्लास्टी करून रक्तपुरवठा सुरळीत करण्यात आला आणि रुग्णाची प्रकृती आता स्थिर आहे. योग्य वेळी उपचार मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ.सिद्धेश खांदे म्हणाले.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !