रावेर तालुक्यात वादळाच्या तडाख्यात 1500 हेक्टरवरील केळी आडवी


Banana crops across 1,500 hectares in Raver Taluka flattened by storm रावेर (3 जून 2026) : रावेरसह यावल तालुक्यात सोमवारी आलेल्या वादळी वार्‍याने केळी उत्पादक शेतकर्‍यांच्या हाता-तोंडातील घास हिरावला आहे. रावेर तालुक्यातील 87 गावातील सुमारे पंधराशे हेक्टरवरील केळी आडवी झाल्याने सुमारे 70 कोटींवर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. काढणीच्या उंबरठ्यावर असलेल्या बागा डोळ्यांसमोर नष्ट झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

प्रशासनाकडून केळी बागांची पाहणी
घटनेचे गांभीर्य ओळखून मंगळवारी सकाळपासूनच प्रशासनाने प्राथमिक पाहणी सुरू केली. नायब तहसीलदार आर. डी. पाटील, तालुका कृषी अधिकारीभाऊसाहेब वाळके, कृषी पर्यवेक्षक कैलास काळे, केळी पीक विमा संरक्षण घेतलेल्या सर्व शेतकर्‍यांनी नुकसान झाल्याची तक्रार विमा कंपनीच्या पोर्टलवर किंवा अधिकृत वेबसाईटवर 72 तासांच्या आत नोंदवावी, असे आवाहन केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी केले आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती कृषी विभागाने सोशल मीडियावर जाहीर केली आहे. स्थानिक तलाठी आणि कृषी सहाय्यकांनी बाधित क्षेत्राला भेटी दिल्या. कृषी विभागाने प्राथमिक नुकसानीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला आहे. या वादळामुळे तालुक्यातील 15 गावांतील घरांचीही अंशत: पडझड झाली असून त्याचेही पंचनामे नोेंदवण्याचे काम सुरू आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !