भुसावळात साने गुरुजी स्मृती सप्ताह व कर्मयोगी वासुदेव गुरुजी स्मृतिदिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव
भुसावळ (8 जून 2026) : शहरातील आपले परिवार सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने साने गुरुजी स्मृती सप्ताह व कर्मयोगी वासुदेव गुरुजी स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला ‘गुणगौरव यशोत्सव – उत्सव गुणवत्तेचा’ व पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी डॉ. बी. व्ही. खाचणे सभागृह, नंदनवन कॉलनीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या मान्यवरांचा गौरव तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण ठरला.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
अध्यक्षस्थानी विधानपरिषद सदस्य आमदार एकनाथराव खडसे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, डॉ.केतकी पाटील, आमदार अमोल जावळे, लोढा ग्रुपचे डेप्युटी सीईओ तुषार येवले, डॉ.पंकज पाटील, प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, महेश फालक, पी.व्ही.पाटील, गणेश नेहते, ललित पाटील, सुहास चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
45 गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
प्रास्ताविक शांताराम पाटील गुरुजी यांनी केले. 5 जून ते 11 जून या कालावधीत साजर्या होत असलेल्या साने गुरुजी स्मृती सप्ताह तसेच कर्मयोगी वासुदेव गुरुजी (माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांचे वडील) यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात 45 गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह व पॅड देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या वतीने गुंजन अत्तरदे यांनी मनोगत व्यक्त केले.
या संस्थांचाही सन्मान
कर्मयोगी वासुदेव गुरुजी संघटक गौरव पुरस्कार 2026 ने माध्यमिक शिक्षण प्रसारक मंडळ, तळवेल, ता.भुसावळ (संस्थापकीय कार्यकारी मंडळ ते विद्यमान कार्यकारी मंडळ नेतृत्व शृंखला), स्थानिक शिक्षण प्रसारक मंडळ, खडका ता.भुसावळ (संस्थापकीय कार्यकारी मंडळ ते विद्यमान कार्यकारी मंडळ नेतृत्व शृंखला), सकल लेवा महिला मंडळ, भुसावळ (संस्थापकीय कार्यकारी मंडळ), लेवा प्रतिष्ठान, वाणी कॉलनी, जुना वांजोळा रोड, भुसावळ (संस्थापकीय ते विद्यमान कार्यकारी मंडळ नेतृत्व शृंखला)
कर्मयोगी वासुदेव गुरुजी प्राध्यापक गौरव पुरस्कार भालोद विद्यालयाचे प्रा.डॉ.सुनील मधुकर नेवे यांना प्रदान करण्यात आला.
कर्मयोगी वासुदेव गुरुजी उपप्राचार्य गौरव पुरस्कार 2026 रावेरच्या सरदार जी.जी.हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे अध्यक्ष, व उपप्राचार्य, प्रा.शैलेश रमेश राणे यांना प्रदान करण्यात आला.
कर्मयोगी वासुदेव गुरुजी मुख्याध्यापक गौरव पुरस्कार वड्री, ता.यावल माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक जयंत रमेश चौधरी यांना प्रदान करण्यात आला.
नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी, ता.मुक्ताईनगरचे मुख्याध्यापक डॉ.शिवचरण मधुकर उज्जैनकर यांना प्रदान करण्यात आला.
कर्मयोगी वासुदेव गुरुजी शिक्षक गौरव पुरस्काराने या मान्यवरांचा गौरव
डॉ.विजय काशिनाथ बागुल (पदवीधर शिक्षक, जि.प. उच्च प्राथमिक शाळा वराड बुद्रुक, ता.जळगाव), ललित अनंत बढे (क्रीडा शिक्षक, सत्कार विद्यामंदिर अट्रावल, ता.यावल), राजेंद्र गुलाबराव साळी (उपक्रमशील कला शिक्षक, एस. बी. चौधरी हायस्कूल, चांगदेव, ता. मुक्ताईनगर), ज्ञानदेव रघुनाथ धांडे (क्रीडा शिक्षक, ज्ञानज्योती विद्यालय, खडके, ता.भुसावळ), योगीता ज्ञानदेव झांबरे (विज्ञान शिक्षिका, मंजाबाई महादू नारखेडे विद्यालय, रुईखेडे, ता.मुक्ताईनगर), हेमांगी अशोक पाटील (उपशिक्षिका, नगरपालिका शाळा क्र. 35, भुसावळ), संजीवनी संजय यावलकर (संचालिका, लिटल फ्लॉवर्स फन स्कूल, भुसावळ), शुभांगी सुनील सरोदे (कवयित्री, पिंपळगाव बुद्रुक ता. भुसावळ, सध्या मुक्काम वापी). दरम्यान, जीवन गौरव पुरस्कार 2026 ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरुण घनश्याम पाटील यांना प्रदान करण्यात आला.
युवा गौरव पुरस्कार 2026 या मान्यवरांना प्रदान
तुषार सुधाकर येवले (डेप्युटी सी.ई.ओ., लोढा ग्रुप (पुणे रिजन), को-चेअरमन इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल पुणे), वैभव किशोर ढाके – (संचालक, राधाकृष्ण लॉन्स, भुसावळ), विनायक शंकर पाचपांडे, (देहदान संकल्प सुवर्ण महोत्सवी वर्षात भुसावळ ते शेगाव पायी वारी अभियान), डॉ.लोकेश सुरेश नेहते (विघ्नहर्ता न्यूरो अँड स्पाईन हॉस्पिटल, भुसावळ), सतीश घनश्याम महाजन (रक्तदूत जीवदान ब्लड ग्रुप, ग्रामीण भुसावळ) पुरस्कारार्थींना आपले परिवार सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शाल, कै. गोदावरी पाटील यांच्या आत्मचरित्रात्मक ‘हितगुज’ पुस्तकाची प्रत व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
पुरस्कारार्थींच्या वतीने कला शिक्षक राजेंद्र साळी यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
सूत्रसंचालन वर्षा लोखंडे व नगरसेविका आशा पाटील व येवले यांनी तर आभार शैलेंद्र महाजन यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रमोद सरोदे, अजय वाघोदे, सतीश ढाके, उदय बोंडे, अनिल फेगडे, पंकज अत्तरदे, अजय पाटील आदींनी परिश्रम घेतले.



