परसाडेतील क्रिकेट स्पर्धा कोरपावलीच्या रॉयल सरकार संघांने जिंकली
यावल (8 जून 2026) : यावल तालुक्यातील परसाडे येथे खुल्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये तालुक्यातून तब्बल 32 संघ सहभागी झाले. अंतिम सामना परसाडे क्रिकेट संघ आणि रॉयल सरकार क्रिकेट संघ कोरपावली यांच्यात झाला. यामध्ये परसाडे संघाने निर्धारीत आठ षटकांमध्ये 98 धावा केल्या होत्या तर प्रत्युत्तरात कोरपावलीच्या रॉयल सरकार क्रिकेट संघाने हा सामना चार गडी राखून जिंकला आणि प्रथम बक्षीस प्राप्त केले. मान्यवरांच्या हस्ते त्यांना साडेतीन हजार रुपये रोख आणि चषक देण्यात आले.
बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. रॉयल सरकार संघाचा कर्णधार समीर तडवी याला या ठिकाणी बक्षीस देण्यात आले. या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन परसाळे येथील मोहसीन तडवी सह आदींनी केले.



