नववी-दहावीच्या अतिरिक्त शिक्षकांना तात्पुरता दिलासा : प्र.ह.दलाल यांची माहिती


Temporary relief for surplus teachers of Classes 9 and 10: Information provided by P.H. Dalal भुसावळ (9 जून 2026) : नववी-दहावीचे शिक्षक अतिरिक्त ठरविण्याचे निकष बदलण्यात आल्याने यापूर्वी अशा शिक्षकांना अतिरिक्त ठरवून त्यांच्या समायोजनाची संपूर्ण प्रक्रियाच चुकीची ठरली असल्याचे शिक्षणतज्ज्ञ प्र.ह.दलाल यांनी कळवले आहे.

दलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 मे 2026 रोजी राज्य शासनाच्या उपसचिवांनी निर्गमित केलेल्या एका शासन निर्णयानुसार, आता सन 2025/26 च्या संच मान्यता प्रक्रियेत बदल होणार आहे.

शासन आदेशानुसार ग्रामीण व दुर्गम भागातील सर्व शून्य शिक्षकी शाळांमध्ये नववी-दहावी या दोन्ही वर्गांची मिळून एकूण 20 विद्यार्थी संख्या असेल अशा शाळेतील शिक्षक अतिरिक्त ठरणार नाही. या दोन्ही वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या 20 किंवा अधिक असेल तर तीन शिक्षक मान्य करण्यात येईल त्यामुळे यापूर्वी या कारणाने अतिरिक्त ठरलेले शिक्षक त्याच शाळेत राहतील. अतिरिक्त ठरणार नाही मात्र ही सवलत फक्त एका वर्षा पुरतीच असेल, अशी माहिती भाजप शिक्षक आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्र.ह.दलाल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !