भुसावळातील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अॅड.जगदीश कापडे यांचे निधन : उद्या अंत्ययात्रा
Former Shiv Sena District Chief of Bhusawal, Adv. Jagdish Kapde, passes away; funeral procession tomorrow. भुसावळ (9 जून 2026) : भुसावळ शहरातील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा ज्येष्ठ विधीत्ज्ञ अॅड.जगदीश कापडे (70) यांचे मंगळवार, 9 जून 2026 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने राजकीय, सामाजिक व कायदे क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.
उद्या अंत्ययात्रा
त्यांची अंत्ययात्रा बुधवार, 10 जून 2026 रोजी सकाळी 9 वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यामागील यांच्या निवासस्थानापासून निघणार आहे. ते अॅड.मिलिंद जगदीश कापडे यांचे वडील होत.
शिवसेना वाढवण्याबाबत मोठे योगदान
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख स्व.राजेंद्र दायमा यांचे घनिष्ठ मित्र राहिलेल्या अॅड.जगदीश कापडे यांनी शिवसेनेच्या कठीण काळात पक्ष वाढवण्याचे कार्य केले व जिल्हाप्रमुख म्हणून शिवसेनेची धुरादेखील सांभाळली. भुसावळसह जिल्ह्यात फौजदारी वकिल म्हणून त्यांचा मोठा नावलौकिक होता.


