आदित्य जीवने जळगाव महापालिकेचे नूतन आयुक्त
ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली : राज्यातील चार आयएएस अधिकार्यांच्या बदल्या
Aditya Jeevane is the new Commissioner of Jalgaon Municipal Corporation. जळगाव (10 जून 2026) : जळगाव महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी युपीएससीच्या 2021 बॅचचे आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांची जळगावात नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील चार आयएएस अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यात जीवने यांचाही समावेश आहे.
बदलीची चर्चा ठरली खरी
गत अनेक दिवसांपासून महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली होणार असल्याची चर्चा होती. यावर शिक्कामोर्तब झाले आहे. राज्य शासनाने मंगळवारी आयएएस अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात सध्या छत्रपती संभाजीनगर येथील महावितरणचे संयुक्त संचालक (जॉईंट डायरेक्टर) म्हणून कार्यरत असणारे आदित्य जीवने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते 2021 सालच्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. दरम्यान, ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली नेमकी कुठे झाली ? हे स्पष्ट झालेले नाही.
अशा झाल्या अधिकार्यांच्या बदल्या
नागपूर विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ.माधवी खोडे-चवरे यांची अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबईच्या सचिवपदी बदली करण्यात आली.
मुंबई अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक सुनील महिंद्रकर यांची अॅडीशनल कंट्रोलर ऑफ स्टॅम्प, मुंबई पदावर बदली करण्यात आली.
अकोला जि.प.च्या सीईटो अनिता मेश्राम यांची नागपूर मनरेगा आयुक्तपदी बदली करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर महावितरणचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आदित्य जीवने यांची जळगाव महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली.
प्रशासकीय गतीमानतेसाठी निर्णय
शासनाच्या या नवीन आदेशानुसार, सर्व संबंधित अधिकार्यांना तत्काळ आपल्या नवीन पदाचा कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जळगाव महानगरपालिकेला आता आदित्य जीवने यांच्या रुपाने नवीन आयुक्त लाभले आहेत तर डॉ. माधवी खोडे-चवरे आता मंत्रालयात अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिव पदाची धुरा सांभाळतील.


