रावेर तालुक्यातील 48 ग्रामपंचायतीत आरक्षणाने प्रस्थापित सदस्यांची कोंडी


रावेर (15 जून 2026) : रावेर तालुक्यातील 48 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसाठी आरक्षण सोडत अलीकडेच जाहीर झाली. आरक्षणामुळे अनेक ठिकाणी प्रस्थापीत सदस्यांची कोंडी झाल्याचे चित्र आहे. विशिष्ट प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागांचे आरक्षण बदलल्याने प्रस्थापित इच्छुकांना मोठा धक्का बसल्याचे सांगण्यात आले.

नवीन आरक्षणानुसार काही वॉर्ड सर्वसाधारण, तर काही वॉर्ड अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग तसेच महिला आरक्षणासाठी राखीव झाल्याने अनेकांची गणिते चुकली. परिणामी, आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक पातळीवरील राजकीय पुनर्बांधणीला वेग आला आहे. 48 लोकनियुक्त सरपंच असो वा सदस्य निवडणूक जिंकणे आता सोपे राहिले नाही.



गावांमध्ये झालेल्या ग्रामसभांमध्ये आरक्षणाची माहिती जाहीर करण्यात आली. आरक्षण निश्चित झाल्यानंतर अनेक गावांमध्ये इच्छुकांनी तयारी सुरू केली असून, काही ठिकाणी उमेदवार शोधण्यासाठी राजकीय गटांची धावपळ वाढली आहे. तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल आता प्रत्यक्षात वाजले असून, सदस्यांच्या बदललेल्या आरक्षणामुळे यंदाची निवडणूक अधिक चुरशीची आणि अनपेक्षित निकाल देणारी ठरू शकते.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !