जीवनदान कपडा परिवारातर्फे बेलव्हायला गरजूंना कपडे वाटप


Distribution of clothes to the needy in Belvalla by the Jeevandan Kapda Parivar भुसावळ (17 जून 2026) : समाजातील गरजू व गरिब घटकांना मदतीचा हात देत जीवनदान कपडा परिवारातर्फे भुसावळ तालुक्यातील बेलव्हाय येथे कपडे वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत गरजू नागरिकांना तीन घागरे, पाच पैठण्या, 25 साड्या, 20 ड्रेस तसेच लहान-मोठ्यांचे विविध कपडे वाटप करण्यात आले.

या सामाजिक उपक्रमामुळे अनेक गरजू कुटुंबांच्या चेहर्‍यावर आनंद फुलला. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत जीवनदान कपडा परिवार सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवत असून या कार्याचे परिसरात कौतुक होत आहे.

यावेळी जीवनदान ब्लड ग्रुप व कपडा परिवाराचे अध्यक्ष सतीश घनश्याम महाजन, वर्षा सतीश महाजन, पवन मुरलीधर भारंबे, ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र कोळी, सुधाकर नेहेते व सहकारी मंडळी उपस्थित होती. उपस्थित मान्यवरांनी समाजातील प्रत्येक सक्षम व्यक्तीने अशा सेवाभावी उपक्रमांमध्ये सहभागी होऊन गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

मानवतेची सेवा हाच खरा धर्म या भावनेतून जीवनदान कपडा परिवाराचे सामाजिक कार्य भविष्यातही अशाच जोमाने सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !