भुसावळ शहरात महाराणा प्रतापसिंह जयंती उत्साहात

चित्तथरारक कसरतींनी वेधले लक्ष : मिरवणुकीत महिलांचा सक्रिय सहभाग


भुसावळ (18 जून 2026) : श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना व जयंती उत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने समिती अध्यक्षा जयश्री पाटील व उपाध्यक्ष प्रतीक्षा पाटील यांच्या नेतृत्वात शहरात महाराणा प्रताप जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शहरातून निघालेल्या मिरवणुकीने व सादर करण्यात आलेल्या चित्तथरारक कसरतींनी लक्ष वेधले.

मंत्री संजय सावकारे यांच्याहस्ते आरती
राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व त्यांच्या सौभाग्यवती रजनी सावकारे यांच्याहस्ते आरती करण्यात आली. या जयंतीचे प्रमुख आकर्षण महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सहभाग होता तसेच समाजातील मान्यवर सुरतसिंह पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष समाधान महाजन, दिलीपसिंह पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विलास पाटील, चोरवड खेडीचे सरपंच भैया महाजन, दीपक भोळे, वराडसीमचे उपसरपंच विजय पाटील, खडका येथील पोलीस पाटील दारासिंग पाटील, जितू पाटील, जळगाव करणी सेनेचे प्रवीणसिंग पाटील, संजना राजपूत, मुक्ताईनगर करणी सेनेचे विलास पाटील, वरणगाव येथील प्रवीणसिंग पाटील, मलकापूर येथील करणी सेनेचे संदीप ठाकूर, बापू राणा, शिवचरण निकम, शिवसेनेच्या तालुकाध्यक्षा वर्षा तल्लारे, संग्रामसिंग पाटील, बी.एन.पाटील, आनंदा राजपूत व असंख्य समाजबांधवांची उपस्थिती होती.



चित्तथरारक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण
मिरवणुकीत मुलींनी केलेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी शहरवासीयांचे लक्ष वेधले. समाज बांधवासाठी समाजसेवक राजू राजपूत यांच्यातर्फे प्रत्येक समाजबांधवाचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला व समाजातील प्रसिद्ध उद्योजक प्रशांत राजपूत यांच्यातर्फे सर्व समाज बांधवाना थंड पेय व आईस्क्रीमचे वाटप करण्यात आले.

यशस्वीतेसाठी आयोजक दामोदर राजपूत, संदीप राणा, सारिका पाटील जयश्री पाटील, प्रतीक्षा पाटील, मीना पाटील, कविता पाटील, वीरेंद्र पाटील, गणेश पाटील व समाजबांधवांनी परिश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !