भुसावळात वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची जयंती उत्साहात साजरी


भुसावळ (19 जून 2026) :मेवाडचे राजे, वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची जयंती भुसावळातील राजस्थानी समाजातर्फे उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. राजस्थानी विप्र संघटनेचे अध्यक्ष विनोद शर्मा यांनी प्रतिमेचे पूजन करून महाराणा प्रताप यांच्या शौर्याला आणि स्मृतीस विनम्र अभिवादन केले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी जे.बी. कोटेचा यांनी मनोगत व्यक्त केले. राजस्थानी समाजातील मान्यवर तसेच विनोद शर्मा, चंद्रसिंग चौधरी, सत्यनारायण शर्मा, जयंतीलाल सुराणा, गौतम चोरडिया, विनोद मेहेता, कांतीलाल चोरडिया, विशाल चोरडिया, विजय चोरडिया, अतुल ताथेड, कैलास डीडवाणी, रामवल्लभ झंवर, जितेंद्रसिंग चौधरी, सुनील ठाकूर, विनोद राठोड यांच्यासह अनेक समाजबांधवांची उपस्थिती होती.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !