माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त अनुभव व छायाचित्रे पाठविण्याचे आवाहन


भुसावळ (19 जून 2026) : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर प्रदीर्घ काळ लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत राहून आपल्या अभ्यासू नेतृत्वाने, संघर्षशील वृत्तीने आणि जनसामान्यांच्या प्रश्नांशी असलेल्या संवेदनशीलतेने राज्याच्या राजकारणात वेगळी छाप निर्माण करणारे खान्देशचे भूमिपुत्र, लोकनेते नाथाभाऊ उर्फ आमदार एकनाथरावजी खडसे हे 2 सप्टेंबर 2026 रोजी वयाची 74 वर्षे पूर्ण करून अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. नाथाभाऊ यांच्या जनसेवेचा प्रदीर्घ, प्रेरणादायी आणि लोकहितकारी प्रवासाचा गौरव करण्यासाठी 2 सप्टेंबर 2026 रोजी अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

अनुभवांचे बोल स्मरणग्रंथात प्रकाशित होणार
आमदार खडसे यांच्या सहवासातील, कार्यातील किंवा जनसंपर्कातील आपल्याला आलेले अनुभव आमंत्रित करण्यात येत आहेत. नाथाभाऊ यांनी असंख्य कार्यकर्ते घडवले, अनेकांच्या वैयक्तिक व सार्वजनिक समस्या सोडविल्या आणि हजारो कुटुंबांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले आहे. त्यांच्या कार्याविषयीचे आपले अनुभव आम्ही अनुभवांचे बोल या स्मरणग्रंथात प्रकाशित करणार आहोत.



लेखासह आठवणी, अनुभव पाठवण्याचे आवाहन
नाथाभाऊ यांच्या राजकीय व सामाजिक प्रवासातील दुर्मिळ छायाचित्रांचे संकलन करून स्मरणिका स्वरूपातील फोटो बुक प्रकाशित करण्याचे नियोजन आहे. आपल्या संग्रहात असलेली त्यांची दुर्मिळ छायाचित्रे पाठवावीत, असे आवाहन करण्यात येत आहे. आपले लेख, आठवणी, अनुभव व छायाचित्रे 30 जून 2026 पर्यंत खालील ई-मेल किंवा संपर्क क्रमांकावर पाठवावीत, असे आवाहन अमृत महोत्सव समितीचे सचिव प्रा.डॉ.सुनील नेवे व आमदारांचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते यांनी केले आहे.

संपर्क-
ई-मेल : eknathkhadse1952@gmail.com
संपर्क- 98232-88689 (प्रा.सुनील नेवे)
94222-78978 (योगेश कोलते)


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !