गोठा शेड योजनेचे अनुदान त्वरीत वितरित करा

भडगाव शेतकरी संघटनेचे अखिलेश पाटील यांचे गटविकास अधिकार्‍यांना निवेदन


Disburse the subsidy for the cattle shed scheme immediately भडगाव (19 जून 2026) : भडगाव तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअतर्गत राबविण्यात येणार्‍या गोठा शेड योजनेचा निधी रखडल्याने तालुक्यातील तब्बल 120 लाभार्थी अद्यापही अनुदानापासून वंचित आहेत. या लाभार्थींना शासन स्तरावर प्रयत्न करून तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अखिलेश पाटील यांनी के.बी.अंजने गट विकास अधिकारी पंचायत समिती भडगांव यांना निवेदन देऊन केली आहे.

अशा आहेत निवेदनातील मागण्या
गत वर्षभरापासून रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येणार्‍या गोठा शेड योजनेत तालुक्यातील बरेच शेतकरी पात्र आहेत. त्यांना अकुशल निधीचेदेखील वितरण झाले नाही. कुशल निधीचे अनुदान अद्याप लाभार्थी शेतकर्‍यांना मिळाले नसल्याने त्यांच्या मनात नाराजीचे वातावरण आहे. शेतकर्‍यांनी स्वखर्चातून गोठा शेडचे बांधकाम पूर्ण केलेले असताना लाभार्थी वर्षभरापासून राहिलेल्या निधीच्या प्रतीक्षेत आहेत,



शेतकर्‍यांना अनुदानाची प्रतीक्षा
शेतकरी हितासाठी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी प्रलंबित प्रकरणे तत्काळ मार्गी लावून शासन स्तरावर प्रयत्न करून निधी उपलब्ध करावा व शेतकर्‍यांना अनुदान वितरित करून शेतकर्‍यांना सहकार्य करावेख अशी मागणी निवेदनाद्वारे भडगाव शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अखिलेश पाटील, उपाध्यक्ष वाल्मीक लोखंडे, रामकृष्ण माळी आदी कार्यकर्त्यांनी भडगावातील पंचायत समिती कार्यालयात केली. गटविकास अधिकारी यांच्यातर्फे सामान्य प्रशासन विभागाचे आर. डी.जगताप यांनी निवेदन स्वीकारले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !