वाडे विकासोच्या चेअरमनपदी डॉ.दिवाकर पाटील यांची बिनविरोध निवड


भडगाव (19 जून 2026) : भडगाव तालुक्यातील वाडे येथील श्री हनुमान विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी डॉ. दिवाकर वेडु पाटील यांची सर्वानुमते नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. अविनाश पाटील अध्यासी अधिकारी होते.

नूतन पदाधिकार्‍यांचा सत्कार
यावेळी संचालक मंडळ व नागरीकांनी नूतन चेअरमन डॉ. दिवाकर पाटील, अशोक भुतेसिंग परदेशी, अविनाश पाटील, प्रेमसिंग पाटील, पत्रकार अशोक परदेशी यांचा सत्कार पुष्पहार, शाल देऊन सत्कार केला. तसेच यावेळी पञकार अशोक परदेशी यांनीही नवनिर्वाचीत चेअरमन डॉ. दिवाकर पाटील यांचा सत्कार केला.



यांची होती उपस्थिती
अशोक भुतेसिंग परदेशी यांनी ठरल्याप्रमाणे चेअरमन पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेसाठी ही निवड घेण्यात आली. यावेळी संचालक चंद्रशेखर चौधरी यांनी सूत्रसंचलन केले. याप्रसंगी व्हा.चेअरमन सुपडू गंगाराम मोरे, संचालक देविदास सहादु माळी, अशोक भुतेसिंग परदेशी, उदयसिंग बाबुसिंग परदेशी, चंद्रशेखर विष्णु चौधरी, विजय रामलाल परदेशी, भाऊसाहेब नामदेव पाटील, कैलास अभिमन माळी, साहेबराव कौतीक माळी, केशरबाई लक्ष्मण माळी, सुंदरबाई रामदास माळी, संगीताबाई शांताराम माळी आदि संचालक तसेच माजी सरपंच आधार माळी, नेताजी सुभाष ग्रामवाचनालयाचे चेअरमन दिनकरराव पाटील, व्हा.चेअरमन शामराव माळी, माजी चेअरमन नारायण परदेशी, पंढरीनाथ चौधरी, इंदलसिंग परदेशी, बाळु पाटील, अरुण माळी, जालिंदर चित्ते, आधार माळी, फौजी एकनाथ माळी, वामन माळी, कवी नामदेव माळी, अशोक परदेशी, शामराव पाटील, नथ्थुसिंग परदेशी, विकी पाटील,विजय गोमलाडु, किशोर महाजन, बंटी पाटील, दुर्गेश चौधरी,विठ्ठल परदेशी, शशिकांत महाजन, दुध उत्पादक सोसायटीचे संचालक सतीष महाजन, शरद चौधरी, सागर पाटील, नारायण महाजन, लिपीक दिलीप पाटील, दुलीचंद परदेशी, ज्ञानेश्वर माळी आदि नागरीक व संचालक उपस्थित होते. सचिव अर्जुन पाटील, प्रेमसिंग पाटील यांनी याकामी सहकार्य केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !