योगाची शक्ती, निरोगी भारताची प्रगती ; भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात योग दिन उत्साहात


The Power of Yoga, Progress Towards a Healthy India: Yoga Day Celebrated with Enthusiasm at K. Narkhede Vidyalaya, Bhusawal भुसावळ (21 जून 2026) : शहरातील के.नारखेडे विद्यालयात जागतिक योग दिन रविवार, 21 रोजी सकाळी सात वाजता उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता अडकमोल, उपमुख्याध्यापक एस.पी.पाठक, संगणक विभागप्रमुख बी.ए.पाटील, पर्यवेक्षक सुनील राणे, बी.बी.जोगी इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते.

शिक्षकांनी केली विविध आसने
प्रसंगी विद्यालयातील क्रीडा शिक्षक निलेश नेहेते यांनी वज्रासन, ताडासन, हलासन, सर्वांगासन, अर्ध पद्मासन, नौकासन धनुरासन, त्रिकोणासन मंडूकासन, शवासन अशा विविध योगासनांची माहिती कथन केली व विद्यालयातील संगणक विभागातील शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनी यांच्यासहित सर्व शिक्षक-शिक्षकेतर बंधू भगिनी व विद्यार्थी यांच्याकडून ही आसने करवून घेतली.




यांनी घेतले परिश्रम
विद्यालयातील उपशिक्षक माधव गरुडे यांनी सुद्धा हलासन या योगासनाचे उत्तम प्रात्यक्षिक करून दाखवले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अ‍ॅड.संगीता अडकमोल यांनी विद्यार्थ्यांना योगासनांचे महत्त्व विषद केले व निरोगी आरोग्यासाठी नियमित योगासने करावी, असा महत्त्वाचा सल्ला सुद्धा विद्यार्थ्यांना दिला. उपक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील क्रीडा शिक्षक प्रदीप सपकाळे, निलेश नेहेते व नवीन नेमाडे यांनी मुख्याध्यापिका संगीता अडकमोल यांच्या मार्गदर्शनानुसार परिश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !